शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहरात प्रतिबंधानंतरही रेस्टॉरंट्स, दुकाने सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 12:24 IST

Khamgaon News दुकानदार नियमाला धाब्यावर बसवून छुप्या पद्धतीने ग्राहकांना प्रवेश देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवरदेखील प्रतिबंध लावले आहेत. मात्र, शहरातील बहुतांश रेस्टॉरंटस्, किराणा व्यावसायिक, स्टेशनरी आणि इतर साहित्याचे दुकानदार नियमाला धाब्यावर बसवून छुप्या पद्धतीने ग्राहकांना प्रवेश देत आहेत.  पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असतानादेखील त्यांना कशाचीही भीती नसल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस् संचालकांना रात्री ९ वाजेपर्यंतची मर्यादा घालून दिली आहे. तथापि, शहरातील बहुतांश रेस्टॉरंट्स चालकांकडून त्याचे पालनदेखील होत असले तरी, काही अतिआगाऊ मालकांकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. त्याचप्रमाणे काही किराणा व्यावसायिक आणि किरकोळ व्यावसायिक संचारबंदीच्या मुदतीची वेळ संपल्यानंतरही आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना सकाळी ९ ते ५ ही वेळ ठरवून दिली आहे. मात्र, या वेळेनंतरही संबंधित दुकानांचे संचालक रात्री उशिरापर्यंत आपली दुकाने उघडी ठेवत असल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आढळून आले. यापैकी अनेक दुकानांवर गर्दी होत असून, दुकानदारांसोबतच ग्राहकही मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येते. मात्र, पालिका पथकाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

बाहेरून शटर बंद, आत दुकान सुरू!  गृहोपयोगी साहित्याच्या दुकानासह, कापड, चप्पल आणि झेरॉक्स सेंटर तसेच स्टेशनरीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्या जात आहे. काही दुकानांचे शटर बाहेरून बंद असतानाही आतून दुकान सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे.

कोरोना रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी कोरोना-१९ नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.-सुनील अंबुलकरशहर पोलीस निरीक्षक, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव