शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी वतपाळ गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू!

By admin | Updated: March 18, 2017 00:56 IST

जिगाव प्रकल्पग्रस्त गावाचे १३५ एकरामध्ये पुनर्वसन.

हिंगणे गव्हाड (जि. बुलडाणा), दि. १७- गेल्या २00८ पासून जिगाव प्रकल्पाचे मातीभिंतीचे नदीपात्रातील बांधकाम अतिशय जोमाने सुरू आहे. या जिगाव प्रकल्पामध्ये ३२ गावे पूर्णत: बाधित असून, १५ गावे ही अशंत: बाधित आहेत. या ३२ गावांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन पुनर्वसन विभागातून राबविले जात असून, या गावांचे पुनर्वसन करण्याकरिता तसेच निधीचा योग्य विनियोग करता यावा म्हणून या सर्व गावांचे पुनर्वसन करण्याकरिता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगाव यांच्या पाच टप्पे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सहा गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामध्ये जिगाव प्रकल्पांतर्गत टाकळी वतपाळ या गावांचे मोमीनाबाद शिवारामध्ये हिंगणे गव्हाड ते मोमीनाबाद रस्त्याने १३५ एकरामध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. देवाशिस कन्स्ट्रक्शन औरंगाबादमार्फत कामाला जोमात सुरूवात झाली आहे. या पुनर्वसित वतपाळ गावामध्ये प्राथमिक शाळेचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, त्यावरील पुलाचे बांधकाम उघडी गटाराचे बांधकाम करणे, ग्रामपंचायत भवन, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम, कोंडवाडा, प्रवेशद्वाराचे बांधकाम, सार्वजनिक शौचालये व गुरांसाठी हौदाचे बांधकाम, स्मशानभूमी रोडचे बांधकाम, बस थांबा यासह १८ जीवनावश्यक सुविधांचा यामध्ये समावेश आहे. याकरिता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगाव यांच्याकडून कामांची पाहणी करण्यात येत आहे. लवकरच काम पूर्ण होणार आहे.