शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

रजतनगरीला अवैध मोबाईल बँकांचे ग्रहण!

By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST

खामगाव शहराला गत काही काळापासून ‘मोबाईल बँक’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या अवैध सावकारीचे ग्रहण लागले आहे.

खामगाव: रजतनगरी म्हणून ख्याती असलेल्या खामगाव शहराला गत काही काळापासून ह्यमोबाईल बँकह्ण या नावाने ओळखल्या जाणार्‍या अवैध सावकारीचे ग्रहण लागले आहे. तथाकथित मोबाईल बँकेच्या माध्यमातून चक्रवाढ पद्धतीने व्याज वसुली केल्या जात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
राज्यात एकेकाळी कापूस आणि त्यानंतर चांदीच्या दागिण्यांमुळे रजतनगरी म्हणून नावारूपास आलेले खामगाव शहर गत काही काळापासून, सावकारीसाठी ओळखल्या जाऊ लागले आहे. शहरातील तथाकथित अवैध मोबाईल बँकांमुळे तर आता हे शहर मोबाईल बँकांचे शहर म्हणून नवी ओळख निर्माण करू लागले आहे. गेल्या काही वर्षांत अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना अधिकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्यामुळे, अवैध मोबाईल बँकांचा व्यवसाय चांगलाच फोफावला असून, चक्रवाढ पद्धतीच्या व्याज वसुलीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
शहरात या तथाकथित बँकांचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरले असून, पैसे वसुलीसाठी त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची टोळकी पोसली आहेत.

**  मोबाईल बँकह्ण म्हणजे काय?
खासगी सावकाराकडून दैनंदिन परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाते. एका ठिकाणाहूनच हा व्यवसाय केला जातो; मात्र सावकाराचे एजंट दररोज फिरून मुद्दल आणि व्याजाची रक्कम गोळा करतात. सावकाराच्या एजंटकडे हप्ता देणे शक्य नसल्यास, कर्जदाराला ती रक्कम खासगी सावकाराच्या निर्धारित ठिकाणी जमा करावी लागते. रकमेची नियमित परतफेड न झाल्यास, दामदुपटीने दंडाची आकारणी केली जाते. विहित मुदतीत परतफेड न केल्यास रक्कम चक्रवाढ पध्दतीने वाढविल्या जाते. हा सर्व व्यवहार नियमबाह्य पद्धतीने होत असून, याकडे संबधीत यंत्रणा डोळेझाक करीत आहे. अनेक अवैध मोबाईल बँका सावकारी कायद्याचीही सर्रास पायमल्ली करीत आहेत.