शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ची अँलर्जी

By admin | Updated: June 14, 2014 23:43 IST

जलपातळी सातत्याने खालावत असतानाही त्यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग योजना राबविण्याकडे शासकीय कार्यालयाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

खामगाव : शहरातील भूगर्भातील जलपातळी सातत्याने खालावत असतानाही त्यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग योजना राबविण्याकडे शासकीय कार्यालयाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

शहरातील मोठय़ा वास्तुमध्ये अथवा शासकीय कार्यालयात ही योजना अंमलात आणल्यास भविष्यातील पाणीटंचाईचे चटके कमी होण्यास मदत होईल. खामगाव शहराचा सध्या झपाट्याने विस्तार होत आहे. शहराची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतसा नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शहरालगत अनेक ले-आऊट निर्माण झाले आहेत. प्रत्येक मार्गावर जणू ले-आऊटचे जाळे दिसून येते. मात्र यापैकी अनेक परिसरात पाणीच उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. जमिनीत २00 फूट बोअर केल्यानंतरही पाणीच लागत नसल्याची परिस्थिती आहे. तेव्हा ज्या भागात राहण्याचे नियोजन असेल त्या ठिकाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आलेले पावसाचे पाणी थेट वाहून जाते. पावसाचे पाणी असेच वाया जात असल्याने त्याचा कोणताही उपयोग होत नाही. हेच पाणी अडविण्यात आले तर त्याचा जनतेला लाभ होवू शकतो. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यास भूगर्भातील जलपातळीत वाढ होण्यास मदत होईल.

खामगाव हे उपविभागीय ठिकाण आहे. येथे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका, पंचायत समिती, भूमिअभिलेख, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, निबंधक कार्यालय, नोंदणी कार्यालय, शासकीय गोदाम याशिवाय मोठी औद्योगिक प्रतिष्ठाणे, शाळा आणि महाविद्यालये, मंगल कार्यालये, संस्कृतीक भवनाच्या मोठय़ा वास्तू आहेत. किमान यासर्व वास्तुमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. मात्र यापैकी बहुतांश कार्यालयाच्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग नसल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय कार्यालयांना तर या प्रकल्पाची अँलर्जीच दिसून येते. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने पुढाकार घेवून जनतेत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येकाला पाण्याचे महत्व पटवून देवून त्या दृष्टीने रेन वॉटर हार्वेस्टींग राबविण्याची आवश्यकता आहे.