विठ्ठल दर्शन रेल्वेचा प्रश्न मार्गी

By Admin | Updated: July 18, 2015 02:07 IST2015-07-18T02:07:56+5:302015-07-18T02:07:56+5:30

खा.जाधव यांनी घेतली रेल्वेमंत्री ना.प्रभु यांची भेट.

The question of Vitthal Darshan Railway will be resolved | विठ्ठल दर्शन रेल्वेचा प्रश्न मार्गी

विठ्ठल दर्शन रेल्वेचा प्रश्न मार्गी

बुलडाणा : सबंध महाराष्ट्राचे लाडके दैवत विठू माउलीच्या दर्शनासाठी ङ्म्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढवारीनिमित्त लाखो भाविक जात आहेत. यासाठी रेल्वे विभागाने विठ्ठल दर्शन फेरी सुरु केली आहे. यात भाविकांच्या दर्शनासाठी निर्माण होणार्‍या अडचणीच्या दृष्टीने बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे मुख्य खासदार प्रतापराव जाधव यांनी १५ जुलै रोजी रेल्वे भवन नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री ना.सुरेश प्रभु यांची भेट घेतली. यावेळी हा प्रश्न मार्गी लागण्याचे दृष्टीने रेल्वेमंत्री यांनी एस.के.सुद मुख्य प्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांनी आदेश दिले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त खामगाव येथून पंढरपूरकडे गेल्या १0 वर्षांपासून विठ्ठल दर्शन नावाने विशेष सेवा रेल्वे विभागाने सुरु केली आहे. यातून दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याने रेल्वेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यात मागील ३ ते ४ वर्षांपासून फेर्‍यावाढ करण्यात आली. आतापर्यंतच्या तिकिट दरात ज्येष्ठ नागरिकांना दरामध्ये सवलत देण्यात येत होती आणि सामान्य नागरिकांकरिता असलेली सवलत सुद्धा बंद करण्यात आली आहे. ही वाढ अन्यायकारक असल्याचे खा.प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री ना.प्रभु यांच्याशी चर्चा करुन लक्षात आणून दिली. शेतकर्‍यांसह समस्त महाराष्ट्रातील नागरिकांचे आराध्य दैवत विठ्ठल माउली आहे. त्यामुळे ङ्म्री क्षेत्र पंढरपूरसाठी रेल्वे विभागाने सामान्य नागरिकांच्या दृष्टीने विचार करुन सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी खा.प्रतापराव जाधव यांनी केली. त्यानुसार जनरलचे १२ डबे व स्लीपरचे ४ डबे या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला वाढविण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या दृष्टीने सोयीचे झाले असून, जनरल डब्यामुळे जनरलचे भाडे प्रवाशांना मोजावे लागणार आहे.

Web Title: The question of Vitthal Darshan Railway will be resolved