शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
3
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
4
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
5
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
6
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
7
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
8
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
9
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
10
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
11
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
12
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
13
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
14
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
15
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
16
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
17
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
18
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
19
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
20
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेतीचे उत्खनन जोमात

By admin | Updated: November 22, 2014 23:53 IST

मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीची तस्करी.

मेहकर (बुलडाणा) : तालुक्यात अवैध रेतीचे उत्खनन जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने रेती माफियांना अभय निर्माण झाले आहे.तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान हो त आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातून एकमेव खडकपूर्णा नदी वाहते. या नदीमध्ये पाच ते २५ फूट खोल रेतीसाठा आहे; परंतु महसूल खा त्याचे काही अधिकारी मलिदा गोळा करण्यात व्यस्त असल्याने पैनगंगासह खडकपूर्णा नदीपात्रातूनही अवैध रेती उत्खननाला पेव फुटले आहे. रेती ठेकेदारांवर राजकीय कृपाछत्र असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात रेतीची तस्करी वाढली असून, खुलेआम अवैध रेतीची वाहतूक केली जात होती. यामुळे शासनाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होते आहे. रात्रीच्यावेळी अवैध रेतीची तस्करी करण्याकरि ता विना नंबर प्लेट वाहनाचा उपयोग रेती माफिया करीत आहेत. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रात्रीची रेती चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महसूल विभागाने रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी गत काही महिन्यांपूर्वी रेती माफियांवर पाळत ठेवून वाहनधारकावर कारवाई केली होती; परंतु त्यानंतर अवैध रेती वाह तुकीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा अवैधरीत्या रेतीचे उत्खनन जोमात सुरू झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेती वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. दिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त नदीपात्रात दोन मीटरपेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतानाही, तसे न होता येथे सर्रास नियमाला मूठमाती दिल्या जात आहे.