इंदूर-अकोला मार्गावर खासगी बसला लागली भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:16 IST2026-03-07T11:15:29+5:302026-03-07T11:16:43+5:30

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

Private bus catches fire on Indore-Akola route; 30 passengers narrowly escape! | इंदूर-अकोला मार्गावर खासगी बसला लागली भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले!

इंदूर-अकोला मार्गावर खासगी बसला लागली भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले!

नांदुरा (जि. बुलढाणा): इंदूर-अकोला मार्गावर नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर एनएल ०७ बी ०६९४ क्रमांकाच्या खासगी बसला शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दल, ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक, रुग्णवाहिका तसेच नांदुरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, वाहनातील सुमारे ३० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

Web Title : इंदौर-अकोला मार्ग पर निजी बस में भीषण आग; 30 यात्री बाल-बाल बचे!

Web Summary : 7 मार्च, 2026 को इंदौर-अकोला मार्ग पर नांदुरा के पास एक निजी बस में आग लग गई। दमकलकर्मियों और स्वयंसेवकों ने लगभग 30 यात्रियों को बचाया। कोई हताहत नहीं हुआ। नांदुरा पुलिस आग के कारणों की जांच कर रही है।

Web Title : Major Fire on Indore-Akola Bus Route; 30 Passengers Escape Unhurt

Web Summary : A private bus caught fire near Nandura on the Indore-Akola route on March 7, 2026. Firefighters and volunteers rescued approximately 30 passengers. No casualties were reported. The cause of the fire is under investigation by Nandura police.