शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

खतांची किंमत दुकानागणिक वेगळी

By admin | Updated: June 14, 2014 23:43 IST

कृषी केंद्रांवर उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांच्या किमतीत तफावत आढळून येत आहे.

मेहकर: कृषी केंद्रांवर उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांच्या किमतीत तफावत आढळून येत आहे. रासायनिक खताचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून, कृषी केंद्रचालक खताची बॅग एमआरपी (कमाल किरकोळ दर) पेक्षा जास्त दराने विकत आहेत. कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने, शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण होत आहे.
पश्‍चिम वर्‍हाडात २ हजार ५५२ परवानाधारक कृषी केंद्र आहेत. खरीप हंगामासाठी ३ लाख ८ हजार ८00 मेट्रिक टन खताची मागणी आहे. त्यापैकी १ लाख ५६ हजार ८९७ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे १ लाख ५१ हजार ९0३ मेट्रिक टन खताचा तुटवडा जाणवत आहे. याचा गैरफायदा कृषी केंद्रचालक घेत आहेत. एमआरपीपेक्षा जास्त दराने शेतकर्‍यांकडून पैसे उकळण्याचा सपाटा कृषी केंद्रचालकांनी लावला आहे. अकोला जिल्हय़ात रासायनिक खताचे परवानाधारक ६0४ केंद्र असून, जिल्हय़ातील खरीप हंगामासाठी ६0 हजार ६00 मेट्रिक टन खताची मागणी आहे.
प्रत्यक्षात केवळ ३१ हजार ५५७ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. वाशिम जिल्हय़ात रासायनिक खताचे ५४८ परवानाधारक केंद्र असून, जिल्हय़ातील खरीप हंगामासाठी ५५ हजार २00 मेट्रिक टन खताची मागणी आहे.
प्रत्यक्षात केवळ २४ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. बुलडाणा जिल्हय़ात १ हजार ४00 परवानाधारक कृषी केंद्र असून, जिल्हय़ातील खरीप हंगामासाठी १ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात १ लाख १ हजार ३४0 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.
बाजारपेठेत डीएपी खताची जास्त मागणी आहे. त्यामुळे ११८३ रुपये किमतीच्या डीएपीच्या एका बॅगसाठी १२00 ते १३00 रुपये मोजावे लागत आहेत. नामांकित कंपनीच्या रासायनिक खतांची किंमत प्रत्येक दुकानात वेगळी असल्याचे दिसून येत आहे. कृषी केंद्रांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात कृषी विभागाची गुणनियंत्रण पथके कार्यरत आहेत. तालुकास्तरावरही गुणनियंत्रण पथक असून, त्यात तीन ते चार अधिकारी काम पाहतात. या पथकांचा धाक नसल्याने कृषी केंद्रचालकांची मनमानी वाढत चालली आहे. याचा फटका पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.

** खताच्या बॅगची एमआरपीपेक्षा जास्त भावाने खताची विक्री.
शेतकर्‍यांनी ज्या किमतीत खत खरेदी केले, त्याची पक्की पावती दिली जात नाही.
कृषी केंद्रांवर खताचा उपलब्ध साठा व त्याच्या किमतीचे फलक लावलेले नसते.
शेतकर्‍यांकडून मागणी असलेल्या खताचा तुटवडा असल्याचे सांगून, त्यांच्या माथी दुसरेच खत मारण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत.
खरीप हंगामाकरिता अकोला, बुलडाणा वाशिम जिल्हय़ांतील रासायनिक खताची मागणी पाहता, १ लाख ५१ हजार ९0३ मेट्रिक टन खताचा तुटवडा आहे. खताच्या बॅगवर असलेल्या एमआरपीपेक्षा जास्त पैसे देऊ नये. दुकानदार जास्त भाव सांगत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे बुलडाण्याचे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले.