शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी पोलिसांची होणार दमछाक

By admin | Updated: September 26, 2014 00:10 IST

निवडणूक व नवरात्रोत्सवाचा पोलिसांवर अतिरिक्त ताण.

बुलडाणा : सण, उत्सवांच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, शांतता-सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येतो. शहरासह ग्रामीण भागात शांतता राखण्यासाठी पोलिस तैनात केले जातात. गुरुवारपासून नवरात्रीस प्रारंभ होत असून, दसरा व त्यातच निवडणुकीची धामधूम राहणार आहे. हा तिहेरी संगम सांभाळताना पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे.नवरात्री व दसर्‍याच्या काळात भाविकांची सर्वत्र गर्दी असते. त्यासाठी पोलिसांची गरज पडते. यानंतर विधानसभा निवडणुका असल्याने पोलिसांचे दडपण नक्कीच वाढणार आहे. आता विधानसभा निवडणुकीचा राजकीय फड रंगणार आहे. या सर्व बाबींमुळे कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांची दमछाक होणार असून, ताणही वाढणार आहे. यामुळे या काळात अतिरिक्त पोलिस मनुष्यबळाची नितांत गरज भासणार आहे. जिल्ह्यातील नवरात्रीत महिलांसह पुरुषही आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. नवरात्री आणि दसर्‍यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीही माजणार आहे. शिवाय आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठीही पोलिसांना लक्ष ठेवावे लागणार आहे. विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, प्रचारकांची रेलचेल, मिरवणुका यावरही पोलिसांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. यात पोलिसांना अधिक श्रम खर्ची घालावे लागणार असून, निवडणुकीसाठी जिल्ह्यात येणार्‍या पैशावरही पाळत ठेवावी लागणार आहे. आता पोलिस यंत्रणा नवरात्री, दसरा आणि निवडणुकांचा कार्यक्रम कसा हाताळते, याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहे.