पैशाचा पाऊस पाडणा-या आरोपींना पोलीस कोठडी

By Admin | Updated: June 6, 2015 01:14 IST2015-06-06T00:55:56+5:302015-06-06T01:14:44+5:30

आणखी दोन आरोपीं अटकेत; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.

Police constables who pay rain money | पैशाचा पाऊस पाडणा-या आरोपींना पोलीस कोठडी

पैशाचा पाऊस पाडणा-या आरोपींना पोलीस कोठडी

लोणार ( जि. बुलडाणा) : जादूटोण्याने बनावटी पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भाबड्या नागरिकांना फसविणार्‍या टोळीचा पोलिसांनी गुरुवारी भंडाफोड केल्यानंतर दुसर्‍या दिवशी ५ जून रोजी टोळीतील आणखी दोन पैकी एका इसमास संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथून ताब्यात घेतले आहे. यामध्ये आरोपींची संख्या सात झाली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरापासून १ किमी अंतरावर हिरडव रोडच्या उजव्या बाजूला असलेल्या जनार्दन मापारी यांच्या शेतातील गोठय़ावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी ४ जून रोजी छापा टाकून शेतमालकासह जादूटोण्याच्या प्रभावाने बनावटी पैशाचा पाऊस पाडणार्‍या अनेकांना ठगविणार्‍या साखरखेर्डा येथील शे.अकील शे.रफिक, भंडारी येथील शे.हारुन शे.जुम्मा, शेंदुर्जन येथील शे.मोहंमद शे.हुसेन, रिसोड येथील धोंडू दिनकर तायडे या पाच इसमांना रंगेहात अटक करण्यात आली. घटनास्थळावरुन मिळालेल्या मुद्देमालासह जादूटोण्यासाठी जवळ दुर्मीळ तीन कोब्रा नाग बाळगल्यामुळे आरोपींवर जादूटोणा कायद्यासोबतच फसवणुकीचा आणि वन्यप्राणी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैशाच्या लालसेपोटी आतापर्यंत अनेकांना गंडविल्याने ४ जूनच्या मध्यरात्री तपासाची चक्रे वेगाने फिरवीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथून मुजफ्फर हुसेन गुलाब मुस्तफा व वाशिम येथून रामदास शंकरराव तायडे या दोघांनाही ताब्यात घेतल्याने आरोपींची संख्या पाचवरुन सात झाली आहे. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी सुहेल शर्मा करत असल्यामुळे आणखी मोठे मासे या प्रकरणात गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Police constables who pay rain money