शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ हरविले

By admin | Updated: December 28, 2014 00:29 IST

बुलडाणा, खामगाव शहरातील वाहतुकीची कोंडी वाढली.

बुलडाणा : जिल्ह्याचे मुख्यालय आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराला ऐतिहासिक व पौराणीक वारसा लाभलेला आहे. इंग्रजकालीन राजवटीतील अनेक पाऊलखुणा आजही येथे अस्तीत्वात आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, दिवसागनीक वाढत असलेली वाहनाची संख्या, याचे नियोजन करण्यास मात्र नगर पालिका अपयशी ठरत आहे. शहरातील अरुंद रस्ते, रस्त्यावर पदोपदी असलेले खड्डे यामुळे वाहनधारक आणि पादचार्‍यास रस्त्यावर चालताना कसरत करावी लागते. शहरात वाहनाची वाढती गर्दी लक्षात घेता रस्त्याच्या कडेला पादचार्‍यासाठी फुटपाथ असणे आवश्यक आहे. तथापि बुलडाणा शहरातील एकाही रस्त्याला फुटपाथ नाहीत. जयस्तंभ चौकातून शहराच्या चारही भागात मुख्य रस्ते जातात.या एकाही रस्त्यावर फुटपाथ नसल्यामुळे पादचार्‍यास त्रास सहन करावा लागतो.* फुटपाथवर अतिक्रमिकांचे वर्चस्व !खामगाव शहरात पादचार्‍यांना रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी सोडलेल्या फुटपाथला रस्त्याच्या दोन्ही बाजुंना अतिक्रमणाचा वेढा आहे. परिणामी वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना रस्त्यावरुन फिरणे अवघड झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही जा दोन्ही बाजुंनी लघु व्यवसायीक वाहनधारकांनी फुटपाथच्या जागेवर ताबा घेतला आहे. रस्त्यालगतचा परिसर चालण्यासाठी मोकळा नसल्याने वाढत्या वाहतुकीने नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेवून चालावे लागते. खामगाव-नांदुरा रस्ता हा वाहतुकीसाठी नेहमीसाठी गर्दीचा झाला आहे. या रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ पाहता रस्ता ओलांडण्यासाठी पादचार्‍यांना सहज १0 ते १५ मिनीट वाट पाहावे लागते.