शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

५0 टक्केच वाढीव मानधन मिळणार

By admin | Updated: March 27, 2015 01:42 IST

वाढ झाली, पण प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार : सहा महिन्यांपासून कलावंत मानधनापासून वंचित.

सिद्धार्थ आराख /बुलडाणा: राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधनामध्ये राज्य शासनाने दीडपट वाढ करून सात कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद केली असली तरी यातील केवळ ५0 टक्केच रक्कम अदा करावी, असे २५ फेब्रुवारीच्या शासन आदेशात म्हटले आहे. त्यातच सध्या मार्च महिन्याच्या ताळेबंदची प्रशासनाला घाई असल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून मानधनाकडे डोळे लावून बसलेल्या वृद्ध कलावंतांना या महिन्यातसुद्धा मानधन मिळते किंवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मागील वर्षी १३ ऑगस्ट २0१४ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मान्यवर साहित्यिक व वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार राज्यातील २२ हजार ९५ वृद्ध कलावंतांना लाभ मिळणार आहे; मात्र आठ महिने उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. २५ फेब्रुवारी २0१५ रोजी दीडपट केलेल्या मानधनवाढीवर ७ कोटी ३२ लाख ८२१५ रुपये रकमेची तरतूद करून ही रक्कम मार्च अखेर वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. ही तरतूद करताना या निर्णयात असेही म्हटले आहे की, चालु आर्थिक वर्षी सध्याच्या दराने वर्षभराच्या मानधनाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे मानधनात जरी दीडपटीने वाढ झाली तरी मूळ तरतूद प्रचलित पद्धतीनुसार वितरीत होत असल्यामुळे सदर शासन निर्णयान्वये वाढीव ५0 टक्के रक्कम १५ ऑगस्ट २0१४ ते २८ फेब्रुवारी २0१५ या ६ महिने १७ दिवस कालावधीसाठी वितरीत करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.