शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

दाेन वर्षात मलेरियाचे केवळ १८ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र ...

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे़ जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेतला असला गत दाेन वर्षात केवळ १८ रुग्ण आढळले आहेत़ जिल्हा हिवताप कार्यालयाच्या ठोस उपाययोजनांमुळे चार महिन्यात हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे उपरोक्त आकडेवारी पाहता कोरोना काळातही बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.

मागील दहा वर्षात ठोस उपाययोजना व उपचारामुळे ही मलेरिया रुग्णांची संख्या हळूहळू खाली आली आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी हीच संख्या हजाराेंच्या संख्येने हाेती़ २०१९ मध्ये १३ व २०२० या वर्षात ५ असे एकूण या दोन वर्षात केवळ अठरा रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील चार महिन्यांत हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्य स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यास २०१५ च्या हिवताप रुग्ण संख्येवरून हिवतापाचे दुरीकरण व हिवतापाचे समूळ उच्चाटन ठरावीक कालावधीत करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुुसार बुलडाणा जिल्ह्यास २०२५ पर्यंत हिवताप दुरीकरण करणे व हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. निदान तत्पर.. उपचार सत्वर.. हे ब्रीदवाक्य घेऊननुसार संशयित हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्याची त्वरित तपासणी करून त्याच दिवशी उपचारास सुरुवात केली जाते. आतापर्यंत खासगी दवाखान्यातून ९८० रक्त नमुने गोळा करण्यात आले आहेत. परंतु त्यापैकी एकही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही. तसेच खासगी प्रयोगशाळांना सुध्दा आरोग्य कर्मचारी भेटी देऊन त्यांच्याकडील हिवताप रुग्णाची माहिती गोळा करीत आहेत. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण घटले आहेत़

३ लाखाच्यावर तपासणींची नोंद

मागील सन २०१९ मध्ये ४ लाख ८८ हजार ८३३ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये १३ रुग्ण हिवतापाचे आढळून आले होते. तसेच २०२० मध्ये ३ लाख २४ हजार ३७ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता हिवतापाचे पाच रुग्ण असे एकूण नाममात्र १८ रुग्ण आढळून आले होते.

काेट

गत काही वर्षात मलेरिया रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली असून जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू आहे़ आराेग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे परिश्रम व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे़ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळल्यास मलेरियाचे जिल्ह्यातून उच्चाटन हाेण्यास वेळ लागणार नाही़

एस.बी. चौहान, जिल्हा हिवताप अधिकारी