शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन अंगणवाडी’ प्रक्रिया खोळंबली!

By admin | Updated: September 20, 2015 23:19 IST

स्वत:ची इमारत आणि वीजपुरवठय़ाचा अभाव.

बुलडाणा : शासनातर्फे महिला आणि बाल विकास विभागाकडून चालविल्या जाणार्‍या जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या हायटेक करण्याची तयारी सुरू आहे. याद्वारे अंगणवाड्यांमधील सर्वच कार्यप्रणाली ऑनलाइन केली जाणार आहे; मात्र बर्‍याच अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत व मुख्यत: वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन अंगणवाडीची ही प्रक्रिया खोळंबली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रशासकीय विभागांचे कामकाज ऑनलाइन झाले आहे. आता शासनाकडून जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण २७११ अंगणवाड्यांसाठी ५ हजार ४२२ कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र यापैकी केवळ ९९२ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर २0१४-१५ मध्ये जिल्ह्यात १३१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंगणवाड्यांमार्फत विविध आरोग्य सुविधांची माहिती, कुपोषण, गर्भवती महिला आणि लहान बालकांना लसीकरणाची माहिती दिली जाते; मात्र आजही जवळपास १५00 पेक्षा जास्त अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाही. वीजपुरवठय़ाचा अभाव असल्याने ऑनलाइन कामकाजाची प्रक्रिया खोळंबली आहे. जिल्ह्यातील बर्‍याच अंगणवाड्यांच्या इमारतीमध्ये वीजपुरवठा उपलब्ध नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:ची इमारतही नाही. ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचार्‍यांना संगणकाचे ज्ञान किती आहे, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यास अडथळे येत असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. चंदन यांनी स्पष्ट केले.

*अंगणवाड्यांमध्ये विविध समस्या

         जिल्ह्यातील बर्‍याच अंगणवाड्या विविध समस्यांच्या गराड्यात आहेत. येथील कार्यरत कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून बरेचदा आंदोलनही करण्यात आले. बर्‍याच कर्मचार्‍यांना इंटरनेट वापराचे ज्ञान नसल्यामुळे अडचणी पुढे येत आहेत. याशिवाय ऑनलाइन प्रकियेसाठी आवश्यक असणारे संगणक संच, इंटरनेट व मुख्यत: वीजपुरवठा इमारतीमध्ये उपलब्ध नाही.