एक गाव एक लग्नतिथी’ची परंपरा कायम

By Admin | Updated: May 19, 2014 00:35 IST2014-05-19T00:03:27+5:302014-05-19T00:35:47+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील दिवठाणा येथे मागील ३१ वर्षापासुन एक गाव एक लग्नतीथीची परंपरा कायम आहे. त्याचा घेतलेला मागोवा

One village has a tradition of marriage | एक गाव एक लग्नतिथी’ची परंपरा कायम

एक गाव एक लग्नतिथी’ची परंपरा कायम

दिवठाणा: १९८३ पासून गावात काळाची गरज व समाज बांधवाचा ऐकोपा यामुळे गावातील विवाह ठरलेल्या मुलीचा विवाह एकाच दिवशी व एकाच मुहुर्तावर सामूहिक विवाहाची चळवळ दिवठाणावासीयांनी सुरू केली आहे. या चळवळीला ३१ वर्ष पूर्ण होत असून १९ मे रोजी ११ जोडप्यांचे विवाह संपन्न होणार आहेत. ह्यगाव करी ते राव काय करीह्ण अशी म्हण गावाचे मोठेपण सांगणारी नेहमी ऐकल्या जाते. या म्हणीचा प्रत्यय चिखली तालुक्यातील दिवठाणा गावाने दिला असून, त्यामुळे दिवठाण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सन १९८३ पासून सुरू झालेली ह्यएक गाव एक लग्न तिथीह्ण परंपरा आजतागायत सुरू आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात एका दिवशी अवाढव्य खर्च करुन डोक्यावर कर्जाचा डोंगर उभारणार्‍या समाजाला हा धडाच आहे. इतर गावात सामूहिक विवाहाची परंपरा मोडीत निघत असताना सर्व गावकर्‍यांना सोबत घेवून एकाच दिवशी दिवठाण्यातील मुलीचे लग्न सामूहिक विवाहात लावण्याची परंपरा अभिनंदनास पात्र आहे. येथे मुलीचा लग्नसोहळा हनुमान संस्थानच्या वतीने दरवर्षी पार पडत असतो. यावर्षी १९ मे रोजी होणार्‍या ११ मुलीचा सामूहिक विवाह पार पडणार आहे. मागिल ३१ वर्षापासून या गावात सुरु असलेली एक गाव एक लग्नतिथीची परंपरा कायम असल्यामुळे इतर गावांसाठी आदर्श ठरला आहे. या लग्न सोहळ्यासाठी जिल्हा भरातील अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने येत असतात. त्यामुळे गावाला उत्सवाचे स्वरूप येणार आहे. सदर एक गाव एक लग्न तिथी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते, दिवठाणा गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Web Title: One village has a tradition of marriage