शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

थाटात विवाह करणे भोवले; विवाहाच्या दिवशीच वधू, वरावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:51 IST

Offence registerd against the bride, the groom नियमांचे उल्लंघन करीत पार पडलेला विवाह सोहळा  वधु वर पक्षाकडील मंडळींना भोवला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना प्रतिबंध नियमाचा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करीत विवाह सोहळा पार पाडल्या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. वधू, वरासह १०४ जणांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणे वधू-वर पक्षाकडील मंडळींना चांगलीच भोवले    आहे.मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा येथे १० मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्थानिक घाईट परिवार व बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील पाटील परिवारातील विवाह सोहळा पार पडला. दरम्यान विवाह प्रसंगी वधू- वर पक्षाकडील शंभर ते दीडशे जणांची उपस्थिती होती. यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे सॅनिटायझर चा वापर न करणे, तसेच विवाह सोहळ्याची परवानगी न घेणे या बाबींमुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला. संबंधितास पूर्वसूचना देऊनही योग्य ती काळजी घेतलेली नसल्यामुळे संबंधितांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई करण्यात यावी, अशी फिर्याद जांबुळधाबा येथील तलाठी एस. ओ. काळे व पोलीस पाटील प्रकाश इंगळे यांनी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी वर-वधू पक्षाकडील चार जणांसह  इतर १०० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यामध्ये नव वधू-वराचा सुद्धा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास बीट अंमलदार पोहेका हुसेन पटेल हे करीत आहे. ही कार्यवाही तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस. डी. पवार, तलाठी एस. ओ. काळे, पोलीस पाटील प्रकाश इंगळे, कोतवाल निलेश तायडे, दिलीप तायडे आदींनी पार पाडली.

नियमांचे उल्लंघन नियमांचे उल्लंघन करीत पार पडलेला विवाह सोहळा  वधु वर पक्षाकडील मंडळींना भोवला.  कोरोना प्रतिबंधक नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग प्रकरणी विविध कलमान्वये १०४ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यंतरी तहसिलदारांची लग्नासाठी परवानगी आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले होते, हे येते उल्लेखनीय.

टॅग्स :khamgaonखामगाव