शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदु-यात आयकर विभागाकडून झाडाझडती!

By admin | Updated: March 21, 2017 01:36 IST

अकोला येथील आयकर अधिकार्‍याची कार्यवाही.

नांदुरा, दि. २0- नांदुर्‍यातील कापड व्यावसायिक लखन टेक्सटाइल्स व मोहीत कलेक्शन येथे सोमवारी खामगाव व अकोला येथील आयकर अधिकार्‍यांनी तब्बल तीन तास झाडाझडती घेतली. मार्च एण्डींगच्या काळात आयकर विभागाच्यावतीने शहरातील या कारवाईमुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.शहरातील सिनेमा रोडवर रामचंदानी यांचे लखन टेक्सटाइल व मोहीत कलेक्शन या नावाने घाऊक व किरकोळ कापडाचा व्यवसाय असून, सोमवारी अचानक या ठिकाणी आयकर विभागाने धाड टाकली. यावेळी दुकानातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जायची व बाहेरील व्यक्तीस आत येण्यास मनाई होती. कारवाई दरम्यान आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी स्टॉक बुक, सेल, परचेस रेकॉर्ड, बिले, खातेवही, दैनंदिन कॅशबुकची कसून तपासणी केली.आयकर विभागाच्या या कारवाईत आयकर अधिकारी रूपा धांडे, आयकर अधिकारी एच.के.निम यांच्यासह आयकर निरीक्षक संजय वानखडे, तुषार ठाकरे, सुनीलकुमार, सी.जी. तिरपुडे यांच्यासह हिरालाल पाटील, एस.डी. वाघ, साजीद हुसेन या कर्मचार्‍यांचा समावेश होता.८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या ५00 व १ हजाराच्या नोटा बदी करण्यास बँकांनी जी मुदत दिली होती, त्यावेळी व्यावसायिक विक्री जास्त दाखवून रोख आवक जास्त दाखविली व आधीची जमा करून ठेवलेली ५00 व १ हजारची रोकड बँकेत भरली व काळा पैसा पांढरा केला. यामुळे सदर कारवाई झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.तीन तासांच्या चौकशीनंतर सदर व्यावसायिकांची नियमित तपासणी असल्याचे आयकर अधिकार्‍यांच्यावतीने सांगण्यात आले. मार्च एण्डींगमध्ये आयकर विभागाच्यावतीने झालेल्या शहरातील या कारवाईमुळे व्यापारी वर्गात चिंता पसरली आहे.