ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या घटली

By Admin | Updated: May 16, 2014 00:04 IST2014-05-16T00:02:28+5:302014-05-16T00:04:31+5:30

वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन्यजीवांची प्रगणना काल बुद्धपौर्णिमेच्या रात्री करण्यात आली आहे.

The number of wildlife in the Durga Ganga Wildlife Sanctuary declined | ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या घटली

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या घटली

खामगाव : वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन्यजीवांची प्रगणना काल बुद्धपौर्णिमेच्या रात्री करण्यात आली आहे. यामध्ये पाणवठय़ावर आलेल्या ६३४ वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. सदर वन्यजीवांमध्ये बिबट ४, अस्वल २१, निलगाय १९३, चिंकारा ११ या व इतर वन्यजीवांचा समावेश आहे. खामगाव वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेसाठी पाणवठे तयार करण्यात आले होते व या पाणवठय़ांच्या काही अंतरावरच मचान उभारण्यात आले होते. या मचानवर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निसर्गप्रेमींनी सहभागी होऊन ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये १४ मेच्या सकाळी ८ ते १५ मे च्या सकाळी ८ वाजेपर्यंत मोहीम राबवून वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खामगाव परिक्षेत्रांतर्गत पलढग, बोथा, ज्ञानगंगा आदी धरणे, तसेच बोथा, माटरगाव, मोताळा, असे तीन वर्तुळ, १९ नैसर्गिक व कृत्रिम पाणवठय़ांवर प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेत ६३४ वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. यामध्ये खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) जी.एम भगत, एम.एस. नेमाडे, वनपाल बोर्डे, चौथनकर, गावंडे, एन.एस.बोरे, जितेंद्र बोदळे, संतोष धामोळे आदी वन अधिकारी व कर्मचारी तसेच निसर्गप्रेमींचा सहभाग होता.

Web Title: The number of wildlife in the Durga Ganga Wildlife Sanctuary declined