शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रयाेगशाळेत अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:06 IST

Buldhana News :  अहवाल नियमित हाेण्यासाठी आणखी दाेन ते तीन दिवसांचा अवधी लागणार आहे़ .

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मार्च महिन्यापासून क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या येत असल्याने बुलडाणा शहरातील काेराेना चाचणी प्रयाेगशाळा दाेन दिवस बंद ठेवण्यात आली हाेती़  त्यामुळे, प्रयाेगशाळेत सात हजारांपेक्षा जास्त स्वॅब प्रलंबित राहिले आहेत.  रात्रंदिवस तपासणी करून प्रलंबित स्वॅबची संख्या चार हजार आणण्यात येणार आहे़.  अहवाल नियमित हाेण्यासाठी आणखी दाेन ते तीन दिवसांचा अवधी लागणार आहे़ .जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़  त्यामुळे प्रशासनाने चाचण्या करण्यावर भर दिल्याने प्रयाेगशाळेवरील ताण वाढला आहे. प्रयाेगशाळेमध्ये एक हजार ते १२०० नमुन्यांची तपासणी सर्वसामान्य स्थितीत करणे शक्य आहे. मात्र, जिल्ह्यातील वाढते काेराेना संक्रमण पाहता प्रयाेगशाळेत दाेन हजारपेक्षा जास्त स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.  प्रयाेगशाळेत आधीच ताेकडे मनुष्यबळ आहे़ त्यातच तपासणी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना काेरोनाने ग्रासले हाेते, तसेच तांत्रिक कारणांमुळे दाेन दिवस प्रयाेगशाळा बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे, प्रयाेगशाळेत जवळपास सात हजार स्वॅब प्रलंबित हाेते़  प्रयाेगशाळेचे कर्मचारी प्रलंबित स्वॅब कमी करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत असून, १० मे पर्यंत ३ ते ४ हजारावर प्रलंबित स्वॅब आणण्याचा प्रयत्न करीत आहेत़  येत्या दाेन ते तीन दिवसांत नियमित चाचण्यांचे अहवाल मिळण्यास सुरुवात हाेणार आहे़. 

दहा ते बारा दिवसांचा विलंब काेराेना रुग्ण वाढत असल्याने काेराेना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. जिल्हाभरातील काेविड सेंटरवरून गाेळा केलेल्या स्वॅबचा अहवाल १० ते १२ दिवसांनंतरही मिळत नसल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे स्वॅब दिलेले ग्रामस्थ गावभर फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे़.

 खामगावातील प्रयाेगशाळा लवकरच सुरू हाेणार बुलडाणा येथील प्रयाेगशाळेवर ताण वाढत असल्याने खामगाव येथे प्रयाेगशाळा सुरू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या प्रयाेगशाळेसाठी तयारी पूर्ण झाली असून, येत्या ८ दिवसांत सुरू हाेणार आहे. त्यामुळे, खामगाव,  शेगाव, नांदुरा, जळगाव जामाेद,  संग्रामपूर तालुक्यातून येणाऱ्या स्वॅबचा ताण कमी हाेणार आहे. या तालुक्यातील  अहवालही लवकर मिळणार आहे़ त्यामुळे अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाण कमी हाेणार आहे. 

 चाचण्या वाढल्याने   ताण वाढला आहे. दाेन दिवस तांत्रिक कारणांमुळे प्रयाेगशाळा बंद असल्याने अहवाल प्रलंबित आहेत.  कर्मचारी रात्रंदिवस काम करून प्रलंबित अहवाल कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  दाेन दिवसांत अहवाल नियमितपणे सुरू हाेतील. डाॅ. प्रशांत पाटील, प्रयाेगशाळा प्रमुख.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या