शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आता सैन्य भरतीही ऑनलाइन

By admin | Updated: August 21, 2015 23:34 IST

वेळ व पैशाची होणार बचत: कसोटीत बसत नसल्यास ऑनलाइन करणार ‘रिजेक्ट’

बुलडाणा : नेहमीसाठी खुल्या पध्दतीने होणारी सैन्य भरती आता बंद करण्यात आली असून यापुढे सैन्यभरती सुध्दा ऑनलाईन पध्दती होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातून भरतीसाठी येणार्‍या तरुणांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. येत्या सप्टेबर महिण्यात होऊ घातलेल्या भरतीमध्ये प्रथमच हा प्रयोग केल्या जाणार असल्याचे संकेत जिल्हा सैनिक कार्यालयाकडून मिळाले आहेत. येत्या सप्टेबर महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात सैन्य भरती होणार आहे. पूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार्‍या भरतीसाठी उमेदवारांना कोणताही अर्ज न करता थेट भरतीसाठी येण्याची मुभा होती. बरेचवेळा उमेदवार शारिरीक चाचण्या आणि मैदाणी चाचण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांना दोन-दोन दिवस पुढील प्रक्रीयेसाठी मुक्काम करावा लागत असे. मात्र त्यानंतरच्या तात्रीक बाबीमध्ये ते बसत नसल्यामुळे त्यांना परत जावे लागे.यामध्ये उमेदवाराचा वेळ व पैसा वाया जात होता. आता ऑनलाईन सैन्य भरतीसाठी ह्यजॉईन इंडियन आर्मी डॉड नीक डॉट इनह्ण ही वेबसाईट बनविण्यात आली आहे. त्यावरच उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा लागणार आहे. भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या ४५ दिवसांपूर्वी या संकेतस्थळावर नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. भरती जाहीर झाल्यानंतर तरुणांना लॉग-इन करण्याची सुविधा साईटवर सुरू करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवारांकडे आवश्यक ती पात्रतेची कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. पूर्वी खुल्या भरतीप्रक्रिये दरम्यान एखाद्या कसोटीत अनुत्तीर्ण होणार्‍या उमेदवाराचा जाण्या-येण्याचा, निवास-भोजनाचा खर्च व्यर्थ जात होता. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे, एखाद्या कसोटीत बसत नसल्यास त्याला ऑनलाईनच ह्यरिजेक्टह्ण करण्यात येईल. त्यामुळे निदान त्याचा खर्च तरी होणार नाही. तर निकषात बसणार्‍या तरुणांना याच संकेतस्थळावर पुढील परीक्षा व शारीरिक चाचण्यांसाठी ह्यअँडमिट कार्डह्ण देण्यात येणार आहे, यामुळे उमेदवारांना कोणताही खर्च न येता आपण भरती प्रक्रीयेत बसतो कींवा नाही हे ऑनलाईन समजेल. परिणामी त्याच्चा पुढील होणारा खर्च व पैशाची बचत होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील तरुणांना भरती प्रक्रिये संदर्भात सविस्तर माहिती सैन्यदलाच्या या साईटवर वेळोवेळी उपलब्ध होणार आहे.