शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
3
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
5
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
6
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
7
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
8
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
9
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
10
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
11
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
12
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
13
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
14
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
15
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
16
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
17
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
18
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
19
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
20
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
Daily Top 2Weekly Top 5

आता नजरा आकाशाकडे

By admin | Updated: June 22, 2014 01:18 IST

बुलडाणा जिल्ह्यात मृग नक्षत्रातही अत्यल्प पाऊस, पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

बुलडाणा : रोहिण्या बरसल्या नाही. आता मृग नक्षत्रास प्रारंभ होऊन आठवडा पूर्ण होत आला; पण पेरणीलायक पाऊस नसल्याने बळीराजासह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. वादळही झाले; मात्र जोरदार पाऊस न झाल्याने सार्‍यांचाच भ्रमनिरास झाला. गेल्या वर्षी ५ व ७ जूनला जोरदार पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली होती; पण यंदा अद्याप पाऊस झालेला नाही. पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांची नासाडी केली आहे. ११ जून रोजी वादळी वार्‍यामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, बुलडाणा तालुक्यातील धाड परिसर तसेच चिखली तालुक्यातील काही भागाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू झाल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.

धूळपेरणी अल्प प्रमाणात
पेरणीसाठी ४५ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. एवढा पाऊस फक्त जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात झाला नाही. मोताळा, खामगाव, नांदूरा, मलकापूर तालुक्यासह बुलडाणा तालुक्यातही धूळ पेरणी होत असते. यावर्षी शेतकर्‍यांनी अत्याल्प प्रमाणात धूळपेरणी केली आहे. मागिल वर्षी धूळ पेरणी केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने बियाणे वाय गेले होते. त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ दाखवली. पुन्हा शेतकर्‍यांनी कर्ज काढून तिबार पेरणी केली. अशा प्रकारे शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी धूळ पेरणीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवली आहे. फक्त ज्या व्यक्तींकडे ठिबक सिंचनची सोय आहे. अशा शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली आहे.

*खते अत्यल्प
बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४00 परवानाधारक कृषी केंद्र असून, जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी १ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख १ हजार ३४0 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.
**अधिक पैशाची मागणी
शेतकर्‍यांची पैसे मोजण्याची तयारी असली तरी विक्रेत्यांकडून खतांचा तुटवडा सांगण्यात येत आहे. आजरोजी बाजारात डीएपी खताची अधिक मागणी होत आहे. त्यामुळे ११८३ रुपये किंमत असलेल्या डीएपीच्या एका बॅगसाठी १२00 ते १३00 रुपये मोजावे लागत आहेत.