शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींनी दिले पाच कृत्रिम श्वसन यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST

चिखली : केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी येथील डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयातील कोविड केअर सेंटरची गरज लक्षात ...

चिखली : केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी येथील डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयातील कोविड केअर सेंटरची गरज लक्षात घेता पाच कृत्रिम श्वसन यंत्र (नॉन इनव्हेजिव्ह व्हेंटिलेटर्सची) घेऊन नागपूरहून रुग्णालयास पाठविले आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयामध्ये कोरोना महामारीच्या काळात कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोना साथरोगाच्या उद्रेकाची भीषण परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाच्या मदतीने रुग्णांकरिता रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणे मिळविण्यासाठी डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालय प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत रुग्णालयास कृत्रिम श्वसन यंत्राची गरज असल्याने रुग्णालय प्रशासनाने केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे या यंत्राची मागणी केली होती. या मागणीची ना. गडकरी यांनी तातडीने दखल घेत रुग्णालयासाठी पाच कृत्रिम श्वसन यंत्र त्वरित नागपूरवरून चिखली येथे पाठविले आहे. रुग्णालयास सदर कृत्रिम श्वसन यंत्र मिळावेत यासाठी नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ना. गडकरी यांनी अत्यंत तत्परतेने कृत्रिम श्वसन यंत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, कोषाध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी, संचालक तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबईचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी ना. गडकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.