बुलडाणा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

By Admin | Updated: June 26, 2014 02:05 IST2014-06-26T01:39:28+5:302014-06-26T02:05:31+5:30

एकमताने ठराव मंजूर: पदाधिकार्‍यांनी केली मागणी

NCP claims Buldhana constituency | बुलडाणा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

बुलडाणा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा, अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये झालेल्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत केली.
बुलडाणा व मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये सेवानवृत्त नायब तहसीलदार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणीवर चर्चा करून शेतकरी व शेतमजूर व उपेक्षित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पाटील यांनी सांगितले की, बुलडाणा विधानसभेमध्ये दोन वेळा काँग्रेसचा पराभव झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बुलडाणा विधानसभा मतदार संघामध्ये अधिक आहे. करिता हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावा, अशा मागणीचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, तालुका अध्यक्ष नसिमबेग मुनिरबेग, सदाशिव घाटे, अनिल वर्मा, वत्सलाबाई जाधव, निलेश देठे, मो.सज्जाद यांनी आपले विचार मांडले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती लक्ष्मी शेळके व जिल्हा परिषद सदस्य सुलोचना पाटील, रेखा जाधव, पं.स.सदस्य किरण जाधव, अनिता शेळके, नगरसेवक उमेश अग्रवाल, भगवानराव शेळके, सुनिता सावळे, आशा पवार, मंगला वायाळ, मधुकर पाटील, पिंपरकर, कदीरोद्दीन, गंजीधर पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: NCP claims Buldhana constituency