शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

चिखली पालिका सभागृहाला भगवानदास गुप्त यांचे नाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

चिखली : नगरपालिकेच्या सभांचे कामकाज ज्या मुख्य सभागृहात पार पडते व सर्व सभांचे आयोजन केले जाते, त्या सभागृहास ‘स्व. ...

चिखली : नगरपालिकेच्या सभांचे कामकाज ज्या मुख्य सभागृहात पार पडते व सर्व सभांचे आयोजन केले जाते, त्या सभागृहास ‘स्व. भगवानदासजी गुप्त सभागृह’ असे नामकरण करण्याचा ठराव पालिकेच्या मासिक सभेत २७ जानेवारी रोजी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी याबाबत मागणी केली होती.

भाजपचे नगरसेवक व माजी सभापती गोविंद रामदास देव्हडे यांनी ३ नोव्हेंबर २०२० रोजी एका अर्जाद्वारे नगरपालिका सभागृहास स्व. भगवानदासजी गुप्त यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीवर आजच्या सभेत विचार करण्यात आला. स्व. भगवानदास गुप्त यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक आणि कृषी आदी वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेली भरीव व उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांच्या नावाचा प्रस्ताव अविरोधपणे सर्वपक्षीय सदस्यांनी मंजूर केला. स्व. भगवानदास गुप्त यांचे कार्य चिखलीकरांसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया गोविंद देव्हडे यांनी यासंदर्भात व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांनी काम पाहिले तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात चिखली नगरपालिकेचे सदस्य म्हणूनही आपले योगदान दिले आहे. त्यांनी चिखली परिसरात शिक्षण आणि सहकारी बँकेचे समृद्ध दालन उघडले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक शाळा व महाविद्यालये आज चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवत आहेत. याशिवाय चिखली अर्बन बँकेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात हजारो सर्वसामान्य लोकांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला जातो आहे. स्व. गुप्त यांच्या या असामान्य कर्तृत्वाची आठवण चिखलीकरांना सदैव राहावी व त्यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान व्हावा या उद्देशाने आपण ही मागणी केली होती, असे ते म्हणाले. आपल्या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन स्व. भगवानदास गुप्त यांचे नाव पालिका सभागृहाला देण्याचा ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल या प्रस्तावाचे सूचक गोविंद देव्हडे यांनी नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे व सर्वपक्षीय नगरसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.