नझुल सर्व्हेअर डुकरे लाच घेताना जाळ्यात

By Admin | Updated: January 22, 2015 00:31 IST2015-01-22T00:31:11+5:302015-01-22T00:31:11+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयाचे नझुल सर्व्हेअर १00 रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Najul Servere pigs get caught in a bribe | नझुल सर्व्हेअर डुकरे लाच घेताना जाळ्यात

नझुल सर्व्हेअर डुकरे लाच घेताना जाळ्यात

बुलडाणा : शेतजमिनीची नक्कल काढण्यासाठी १00 रूपयांची लाच स्वीकारताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नझुल सर्व्हेअर परमेश्‍वर डुकरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले. बुलडाणा तालुक्यातील करडी येथील आकाश चंदन सोनुने वय २0 यांनी मौजे करडी शिवारातील त्यांचे नातेवाईक रामेश्‍वर भगवान तायडे यांची करडी गावातील गट नंबर १२५/१९४ चे ९/३ ची जमिनीची नक्कल काढण्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दिला होता; मात्र यासाठी नझुल सर्व्हेअर परमेश्‍वर त्र्यंबक डुकरे (वय ५४ ) याने नकलेसाठी १00 रूपयांची लाच मागितली. याबाबत सोनुने यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.एल.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.बी. भाईक, भांगे, शेगोकार, नेवरे, नाईक, गडाख, जवंजाळ, ठाकरे, चोपडे, ढोकणे, वाळुले, सोळंके, यादव आदींनी प्रशासकीय इमारतीच्या भूमिअभिलेख कार्यालय परिसरात आज सापळा रचला, यावेळी पथकाने नझुल सर्व्हेअर परमेश्‍वर त्र्यंबक डुकरे याने तक्रारकर्ते आकाश सोनुने यांच्याकडून १00 रूपयांची लाच स्वीकारताच रंगेहाथ पकडले व लाचेची रक्कम जप्त केली. याप्रकरणी आरोपी परमेश्‍वर डुकरे याच्याविरूद्ध भादंवि ७, १३, (१),(ड), १२(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Najul Servere pigs get caught in a bribe