इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:53+5:302021-07-07T04:42:53+5:30

केंद्र सरकारने लोकशाहीला मूठमाती देत हुकूमशाही पद्धतीने सामान्य जनतेचा विचार न करता पेट्रोल-डिझेल खाद्यतेल व गॅस दरवाढ केली आहे. ...

Movement against fuel price hike | इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

केंद्र सरकारने लोकशाहीला मूठमाती देत हुकूमशाही पद्धतीने सामान्य जनतेचा विचार न करता पेट्रोल-डिझेल खाद्यतेल व गॅस दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. सोबतच महिलांचे घरगुती व्यवहार कोलमडले आहेत, असे स्पष्ट करतानाच या दरवाढीबाबत केंद्र सरकार निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ५ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर चुली पेटवून व त्यावर स्वयंपाक बनवून आपला रोष व्यक्त केला. यासंदर्भाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल व गॅस दरवाढ दरवाढ तातडीने मागे घेऊन सन २०१४ व्या पूर्वीचे दर कायम करावेत, अशी मागणी केली आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर व देशभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या आंदोलनात विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोंद्रे, दत्ता खरात, विनायक पडघान, तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, राम खेडेकर, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, शेखर बोंद्रे, प्रशांत एकडे, प्रशांत डोंगरदिवे, विशाल काकडे, प्रमोद चिंचोले, दिलीप महाजन, रत्नमाला सोळंकी, कल्पना केजकर, बानूबाई जैवाळ, लक्ष्मी साळवे, शशीकला साळवे, प्रतीभा गवई, महाजन, संकेत पाटील, गणेश पाटील, शिवाजी पाटील, सदानंद मोरगंजे, शेख रफिक राजीक खान, दिलीप हेलगे, दीपक कदम, दत्ता गावंडे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Movement against fuel price hike