शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर निवडणूक निकाल :  संजय  रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 17:39 IST

Mehkar Vidhan Sabha Election Results 2019: मेहकर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.

बुलडाणा: विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. रायमुलकर यांच्या रुपाने शिवसेनेचा प्रतापगड असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. मेहकर मतदारसंघातील निवडणूक शिवसेना व काँग्रेस अशी दुरंगी होती. या लढतीमध्ये शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा, तर काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने जातो याची उत्सुकता सर्वांना लागली होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आणि त्यानंतर शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवण्याची किमया साधली. सलग तिसºयांदा विजय मिळवितांना त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अनंत वानखेडे यांचा पराभव केला. दुहेरी लढतीतही रायमुलकर यांनी आपला गड कायम ठेवला आहे. मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी १ लाख १२ हजार ३८ मतं मिळविली आहेत. तर काँग्रेसचे अ‍ॅड. अनंत वानेखेडे यांना ४९ हजार ८३६ मतांवर पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी ८० हजार ८६१ मते घेऊन त्यावेळी काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला होता.

टॅग्स :mehkar-acमेहकरSanjay Raymulkarसंजय रायमुलकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019