शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपग्रहाद्वारे होणार शेतजमिनीची मोजणी

By admin | Updated: September 1, 2015 01:40 IST

मलकापूर येथे पालकमंत्री खडसे यांची घोषणा.

मलकापूर (जि. बुलडाणा): राज्यातील शेतकर्‍यांचा बांध्यावरचा होणारा वाद संपुष्टात आणण्यासाठी येणार्‍या काळात शासन उपग्रहाद्वारे जमिनीची मोजणी करेल. त्यासाठी अडीच हजार कोटीचा खर्च आहे. आधी सहा जिल्ह्यात तर पुढील टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात हा प्रयोग होईल, सोबतच सर्व व्यवस्था ऑनलाइन झाल्याने शे तकर्‍यांना घरपोच सातबारा देण्यात येईल, तशी घोषणा महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी येथे केली. येथील महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ना.खडसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर होते. तर प्रमुख उपस्थिती खा.रक्षाताई खडसे, खा.प्रतापराव जाधव, आ. चैनसुख संचेती, आ.गोपीकिशन बाजोरिया, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, नगराध्यक्ष मंगला पाटील आदींची होती. ना.खडसे म्हणाले की, अनेक वषार्ंपासून जमिनीच्या वादाची प्रकरणे प्रलंबित आहेत. हे सर्व वाद जमिनीची मोजणी केली तर संपुष्टात येतील. जिल्हय़ातील पूरपीडितांसाठी तसेच रमाई घरकुलासाठी जागाचे समस्या आहे. या सार्‍यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी महसूल विभाग शेतकरी तथा सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले. तर शासनाच्या विविध योजनांचा गोषवारा विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांनी मांडला. आ.चैनसुख संचेती यांनी महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीमध्येच समन्वय साधून जनसमस्या सोडवाव्यात, असे आवाहन केले तर खा.रक्षा खडसे यांनी महसूल प्रशासन लोकाभिमुख व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अपर जिल्हाधिकारी देवानंद टाकसाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष अनिल झोपे, बा.स. प्रशासक साहेबराव पाटील, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता मि िथलेश चव्हाण, एसडीओ दिनेशचंद्र वानखेडे, भाजप नेते मोहन शर्मा, पं.स. सभापती विद्या नारखेडे, रामभाऊ झांबरे, सुनील नाफडे, रूपेश श्रीश्रीमाळ, सोपान खाचणे, अनिल पाचपांडे, दीपक जावरे, उल्हास संबारे, घनश्याम वर्मा आदी हजर होते. संचालन प्रा.गणेश कोलते तर आभार तहसीलदार रवींद्र जोगी यांनी मानले.