शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

विकासाबाबत नगराध्यक्षा बोंद्रेंनी विरोधकांना चित केले : धृपदराव सावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकास देखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकास देखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी नगरपरिषदेच्या पिचवर आपल्या चौफेर फटकेबाजीने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यांनी धावांच्या डोंगराप्रमाणे जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, तो सर करणे विरोधकांना कदापी शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी येथे केले.

युवा नेते कुणाल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्व. दत्ता पैठणकर स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच नगराध्यक्षा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन धृपतराव सावळे व माजी जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेशआप्पा खबुतरे, शिवाजीराव बनसोडे, मंगेश व्यवहारे, संजय चेके पाटील, राजू जावळे, काशिनाथ बोंद्रे, नंदकिशोर सावडतकर, अतहर काझी, कपिल खेडेकर, शहजाद, न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस, जि.प.सदस्या डॉ.ज्योती खेडेकर, रामदास देव्हडे, सुरेंद्र पांडे, अनिल पळसकर, पंडितराव देशमुख, राजू गवई, गोपाल देव्हडे, शेखर बोंद्रे, अ‍ॅड. राजपाल बडगे, नगरसेवक प्रकाश शिंगणे, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विमल देव्हडे, नामू गुरुदासानी, दीपक खरात, मो.आसीफ, अ.रऊफ, अनुप महाजन, शैलेश बाहेती, पप्पू राजपूत, अमोल खेडेकर, मनोज खेडेकर, संजय गायकवाड, रहीम पठाण, सुरेंद्र ठाकूर, राजू कुलकर्णी, खालील बागवान, गोविंद कोठारी, नासिर सौदागर, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान येत्या काही महिन्यांत नगरपरिषदेची निवडणूक घोषित होणार असल्याने आता हाती राहिलेल्या महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेट न खेळता २०/२० सारखे खेळावे लागणार असून या वेळात जास्तीत जास्त विकासनिधी शासनाकडून खेचून आणण्याचे काम करावे लागणार असल्याचे सावळे यांनी स्पष्ट केले.संचालन गणेश धुंधळे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)

शारीरिक तंदुरूस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक

: नगराध्यक्षा बोंद्रे जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे, आजची पिढी ही मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्यात जास्त व्यस्त असते. याचा विपरित परिणाम शरीरावर होत असल्याने मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहेत, असे नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॅप्शन : स्पर्धेचे उद्घाटन करताना सावळे, खेडेकर, नगराध्यक्षा बोंद्रे आदी मान्यवर. ..............................