विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: May 30, 2014 00:37 IST2014-05-29T23:39:06+5:302014-05-30T00:37:42+5:30

मोताळा तालुक्यातील कोर्‍हाळा बाजार येथील २0 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.

Marriage Suicide | विवाहितेची आत्महत्या

विवाहितेची आत्महत्या

मोताळा: तालुक्यातील कोर्‍हाळा बाजार येथील २0 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. मृतकाचे नाव रुपाली ज्ञानेश्‍वर महाले असे असून, गुरुवारी २९ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घटना उघडकीस आली. मृतक महिला ही कोर्‍हाळा बाजार येथील असून, सात ते आठ महिन्यांपूर्वी गावा तीलच महाले कुटुंबामध्ये तिचे लग्न झाले होते. आज सकाळी अचानक रुपाली महाले ही महिला घरातून गावालगतच्या खांडवा रस्त्याकडे पळत सुटली. काही अघटित होऊ नये यासाठी नातेवाईक मंडळीसुद्धा सदर महिलेच्या पाठोपाठ धावत सुटले. दरम्यान, रु पाली महाले या महिलेने दिनकर रामा वाघ यांच्या शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. धामणगाव बढे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Marriage Suicide