शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

खत-बियाणे खरेदीचा बाजार ठप्प

By admin | Updated: June 12, 2014 22:42 IST

कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणारा खते, बिबीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे.

बुलडाणा : कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणारा खते, बिबीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत असलेला शेतकर्‍याने बियाणे खरेदीसाठी हात आखडला आहे. आतापयर्ंत केवळ २0 टक्केच बियाण्यांची विक्री झाल्याची माहीती बियाणे विक्रेत्यांनी दिली. मागील वर्षी याच काळात जवळपास ८0 टक्के बियाणाची विक्री झाली होती. एक चांगला दमदार पाऊस झाल्यानतंर शेतकरी बियाणे खरेदीला प्रारंभ करतील त्यानंतरच गर्दी वाढेल.
गतवर्षी खरीप हंगामात अतवृष्टी आणि रब्बी हंगामात झालेली गारपिट यामुळे शेतकरी पूर्णत:उध्दवस्त झाला आहे. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. मागील वर्षी तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने शेतकर्‍यांना पिक कर्जही दिले नव्हते. या अस्माणी संकटामुळे यावर्षी पुन्हा शेतकर्‍या समोर पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मागील वर्षी मृग नक्षत्रात शेतकर्‍यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी मृग नक्षत्र सध्या कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. अजूनही उन्हाचा तडाखा कमी झाला नाही. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहेत. जिल्ह्यात घाटाखाली मोताळा, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील काही भागात धुळ पेरणी होती. तर बुलडाणा तालुक्यात धाड, चांडोळ, मासरुळ, मौंढाळा या भागात धुळ पेरणी शेतकरी करतात. यावर्षी सुध्दा काही भागात धुळ पेरणी झाली. यामध्ये कपाशी, मका,भुईमुगाची पेरणी केल्या जाते. जिल्ह्यातील मागील वर्षी १३ तालुक्यात सोयाबीनचा पेरा २६६९२९ हेक्टर क्षेत्रावर होता. यावर्षी ३ लाख ६१ हजार ८९0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र जास्त आहे. तर तूर, मुंग, उडिद आणि इतर कडधान्य पिकासाठी एकून १ लाख १९ हजार ५५२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.
कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी, सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा आहे. चार एकराच्या आतील शेतकरी वेळेवर खत, बिबीयाणे खरेदी करतो. सध्या शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. एखादा चांगला पाऊस झाला म्हणजे खते, बियाणे खरेदीला वेग येईल. सध्यातरी शेतकर्‍यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही. बियाण्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षाही शेतकर्‍यांना आहे.