अनेक गावांमध्ये सुरू झाल्या हातभट्ट्या

By Admin | Updated: April 24, 2017 00:24 IST2017-04-24T00:24:24+5:302017-04-24T00:24:24+5:30

खामगाव- मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या अनेक गावांमध्ये हातभट्ट्या सुरू होत असल्याचे चित्र आहे.

Mammals started in many villages | अनेक गावांमध्ये सुरू झाल्या हातभट्ट्या

अनेक गावांमध्ये सुरू झाल्या हातभट्ट्या

महामार्गावरील दारूबंदीचा असाही परिणाम

नितीन निमकर्डे - खामगाव
महामार्गावरील दारू विक्रीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने दारु विक्रीच्या अनेक दुकानांवर गंडांतर आले असून, मद्यपींची पंचाईत झालेली आहे. त्यामुळे काही मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या अनेक गावांमध्ये हातभट्ट्या सुरू होत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर होणाऱ्या दारू विक्रीमुळे दारू पिवून वाहन चालविण्याचे व अपघातांचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावरून न्यायालयाने महामार्गांवरील दारू विक्री बंद करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार ३१ मार्च २०१७ नंतर नवीन परवाने देणे शासनाने बंद केले. तसेच महामार्गावरील व महामार्गापासून ५०० मीटरच्या परिघातील दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात न आल्याने ते परवाने संपुष्टात आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील विविध महामार्गांवरील शेकडो दुकानांना टाळे लागले आहेत. यामुळे मद्यपींची मात्र चांगलीच पंचाईत झालेली असून, चोरट्या मार्गाने होणारी दारू विक्री वाढली आहे, तर दुकाने बंद झाल्याने अनेक मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला असल्याचेही दिसून येते. या संधीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या काही गावांमध्ये नव्याने हातभट्ट्या सुरू होत असल्याचे दिसून येते.

संघटित विरोधाची तयारी

काही ठिकाणी हातभट्ट्यांना संघटित विरोध करण्याची तयारी नागरिकांनी विशेषत: महिलांनी चालविली आहे. गावात नव्याने दुकाने सुरु करू पाहणाऱ्यांनाही ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दारू विक्रेते व हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांविरुद्ध अनेक गावात संघर्षाचे प्रसंग उभे राहतील, असे दिसून येते.

Web Title: Mammals started in many villages