मलकापूर पांग्रा शिवारात देशी दारु जप्त

By Admin | Updated: July 18, 2015 02:13 IST2015-07-18T02:13:22+5:302015-07-18T02:13:22+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Malkapur seized country liquor in Pangra Shivar | मलकापूर पांग्रा शिवारात देशी दारु जप्त

मलकापूर पांग्रा शिवारात देशी दारु जप्त

बुलडाणा : मलकापूर पांग्रा ते मांडवा मार्गावर देशी दारुची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेकडून १६ जुलै रोजी सायंकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारुचे बारा बॉक्ससह साडेतीन लाखाचा माल जप्त केला. यातील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व त्यांच्या पथकाने मलकापूर पांग्रा ते मांडवा मार्गावर सापळा रचून देशी दारुची अवैध वाहतूक करणारी एमएच १२ जेयू ३७८५ इंडिका अडविली. या इंडिका गाडीतून १२ देशीदारुच्या बॉक्ससह संतोष रावबा नागरे रा. खळेगाव ता.लोणार याला ताब्यात घेतले. या कारवाईत इंडिका कार, दारुच्या शिश्या, मोबाईल असा साडेतीन लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

Web Title: Malkapur seized country liquor in Pangra Shivar