शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळा संकटात !

By admin | Updated: September 2, 2015 02:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ३१ शाळांचा ‘रेड झोन’मध्ये समावेश.

बुलडाणा : कमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधिन आहे. याबाबत आदेश देऊन जिल्ह्यात चाचपणी सुरू झाली आहे. अशा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ३१ शाळांना फटका बसणार असून, त्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी शासनाने पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. बंद होणार्‍या शाळांचे समायोजन किलोमीटर अंतर असलेल्या शाळेत करण्याची कार्यवाही प्रशासनस्तरावर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ३९४ शाळा आहेत. त्यापैकी २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेत शासकीय १, जिल्हा परिषदेच्या १७, नगरपालिकेची १ व स्वयंअर्थसहाय्यीत १२ अशा एकूण ३१ शाळा आहेत. ३0 पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या उच्च माध्यमिक शाळेत स्वयंअर्थसहाय्यीत १, आदिवासी आश्रम शाळा १ अशा २ शाळा आहेत. तर ४0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्वयंअर्थसहाय्यीत ५ शाळा आहेत. याबाबत शासनाच्या आदेशान्वये शाळांची पटसंख्या तपासणी करण्यात येत असून, २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३१ शाळा बंद होणार असल्याचे संकेत आहेत. या ३१ शाळांचे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.