शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींसाठी धावणार लाडली एक्सप्रेस!

By admin | Updated: January 5, 2017 17:17 IST

‘‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’’ कार्यक्रमाअंतर्गत मुलीची संख्या जिल्ह्यात वाढविण्याकरीता व्यापक जनजागृतीसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ बुलडाणा व आरोग्य विभाग जिल्हा परिषद

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 5 - ‘‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’’ कार्यक्रमाअंतर्गत मुलीची संख्या जिल्ह्यात वाढविण्याकरीता व्यापक जनजागृतीसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ बुलडाणा व आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने लाडली एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. या शाळेत ये- जा करणाºया विद्यार्थिंनीसाठी सदर एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.
‘‘बेटी बचाओ बेटी पढाओ’’ या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मुलीची संख्या वाढविण्याकरीता विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. मुलीचे महत्त्व, मुलीच्या शिक्षणाचे महत्व जनतेमध्ये पटवून देण्याकरीता शासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. सध्या क्रीडा, शिक्षण, राजकीय, शासकीय नोकऱ्या ह्या सर्व क्षेत्रात मुली पुरुषांच्या तुलनेत आघाडीवर आहेत.
 महाराष्ट्र  परिवहन महामंडळाच्या बसेस जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागापर्यंत हजारो प्रवाशांची नेआण करतात. एस.टी.बसवर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश देऊन मुलींची संख्या जिल्ह्यात वाढविण्याकरीता व्यापक जनजागृती होण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्र परिवहन महामंडळ बुलडाणा व आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एस.टी.बसवर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देवून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून
डॉ.विजय झाडे जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या शुभहस्ते लाडली एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे व्यापक जनजागृती होऊन जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होईल व ते मुलांकरीता गर्भलिंग निदान करणार नाही. तसेच ज्या कुटूंबामध्ये मुली आहेत त्यांचे संगोपन चांगल्या रितीने करून त्यांना उच्च शिक्षीत करतील असे मनोगत डॉ.विजय झाडे जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
यावेळी सदर कार्यक्रमास श्रीमती दीपा मुधोळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा डॉ.शिवाजी पवार जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी अनिल मेहतर विभागीय नियंत्रक बुलडाणा, सुभाष पाटील, विभागीय वाहतुक अधिकारी रविंद्र खेडेकर आगार व्यवस्थापक दिपक साळवे स्थानक प्रमुख दीपक वैद्य सहाय्यक वाहतुक नियंत्रक, महाराष्ट्र परिवहन महामंडळ बुलडाणा तसेच डॉ.आर.डी.गोफणे अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत बढे तालुका आरोग्य अधिकारी बुलडाणा, डॉ.इमरान खान तालुका आरोग्य अधिकारी चिखली, डॉ.सैयद वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र चांडोळ,  आर.बी.जाधव जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री.राजेश लोखंडे तसेच आरोग्य विभाग व एस.टी.महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी व बसस्थानकातील अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणावर हजर होते. (प्रतिनिधी)