तरवाडी येथील गारपीटग्रस्त अनुदानापासून वंचित

By Admin | Updated: May 16, 2014 00:05 IST2014-05-15T23:27:52+5:302014-05-16T00:05:50+5:30

तरवाडी (नांदुरा) येथील गारपीटग्रस्तांचा सर्व्हे मनमानीपणे झाला असून, खरे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

Lack of hailstormed subsidy in Tarwadi | तरवाडी येथील गारपीटग्रस्त अनुदानापासून वंचित

तरवाडी येथील गारपीटग्रस्त अनुदानापासून वंचित

खामगाव : तरवाडी ता. नांदुरा येथील गारपीटग्रस्तांचा सर्व्हे मनमानीपणे झाला असून, खरे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अनुदान मिळावे, अशी मागणी तरवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबत १२ मे रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की तरवाडी येथील गारपीटग्रस्तांचा सर्व्हे तलाठी श्रीमती देशमुख, कृषी सहाय्यक जाधव, ग्रामसेवक दाते, सरपंच, पोलिस पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात ज्यांचे नुकसान झाले अशांची नावे सर्व्हेमधून डावलून नुकसान झाले नसलेल्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे नुकसान झालेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.

Web Title: Lack of hailstormed subsidy in Tarwadi