कामगारांचे पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित!

By Admin | Updated: January 6, 2017 02:35 IST2017-01-06T02:35:06+5:302017-01-06T02:35:06+5:30

३ हजार ८७५ विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी

Labor's boycott of scholarship! | कामगारांचे पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित!

कामगारांचे पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित!

बुलडाणा, दि. ५- इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविल्या जाते. जिल्ह्यात यावर्षी ३ हजार ८७५ विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील १0२ विद्यार्थ्यांंना या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येते. या अंतर्गत कामगाराच्या पाल्यांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, शैक्षणिक प्रवेश योजना राबविल्या जातात. यातून कामगार पाल्याची प्रगती करणे हाच उद्देश आहे.
जिल्हा कामगार कार्यालयाकडे नोंदणी असलेले कामगाराच्या पाल्यांना इयत्ता १ ली ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १0 वी, ११ वी व १२ वी तसेच पुढे महाविद्यालय, पदवि, पदविकापासून थेट वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. लाभ घेण्यासाठी जिल्हा कामगार कार्यालयाकडे विद्यार्थ्यांंकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते; मात्र कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे सदर विद्यार्थ्यांंना वगळण्यात आले.

Web Title: Labor's boycott of scholarship!