शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहराच्या पाणीपुरवठय़ातील अडथळा दूर!

By admin | Updated: November 19, 2014 01:21 IST

जलशुद्धीकरण केंद्रासाठी टेंभूर्णा येथे विभागीय आयुक्तांकडून परवानगी.

खामगाव (बुलडाणा): शहरासाठी संजीवनी ठरणार्‍या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी अमरावती विभागीय आयुक्तांकडून जमिनीचा ताबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या तहानेतील मोठा अडसर आता दूर झाला आहे. तथापि, या जागेच्या मोबदल्यात पालिकेला ५३ लक्ष रुपये मोजावी लागणार असल्याची माहिती आहे.सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी वामन नगर येथे १७ लाख लिटर तर घाटपुरीमध्ये २१ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत, तर खामगाव शहरात या दोन टाक्यावरून जवळपासच्या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव निदर्शनास आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६२ कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गेल्या चार-साडेचार वर्षांंपासून या योजनेचे शिर्ला येथील मन प्रकल्पातून काम सुरू असून योजनेवर ७0 टक्के खर्च करण्यात आला आहे; मात्र या योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जागेअभावी रखडले होते. दरम्यान, पालिकेच्या महत प्रयत्नांती जलशुद्धीकरण केंद्रासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातून जागेचा ताबा मंजूर करण्यात आला आहे; परंतु यासाठी पालिकेला तब्बल ५३ लक्ष रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. खामगाव नगरअध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी पाणी टंचाईस प्रथम प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट केले. जमिनीचा आगाऊ ताबा मंजूर करण्यासाठी प्रशासनाने ५३ लक्ष रुपये किंमत निश्‍चित केली आहे. ही किंमत कमी करण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहारास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केली.