शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहर सौंदर्यीकरणाचे तीनतेरा !

By admin | Updated: June 12, 2014 20:52 IST

‘बांधा आणि जाहीरात करा’ या तत्वानुसार खामगाव शहरात विविध ठिकाणी चौकांचे सौंदर्यीकरण ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली.

खामगाव : ह्यबांधा आणि जाहीरात कराह्ण या तत्वानुसार खामगाव शहरात विविध ठिकाणी चौकांचे सौंदर्यीकरण ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली. शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ व्हावी या उदात्त हेतुने राबविलेल्या या योजनेकडे नगर पालिका प्रशासन व संबंधित चौकाचे सौंदर्यीकरण दायित्व स्विकारलेल्या सामाजिक संस्था अथवा ग्रुपने दुर्लक्ष केल्याने ही योजना धुळखात पडून आहे. परिणामी शहर सौंदर्यीकरण योजनेचे ह्यआता वाजले की बाराह्ण म्हणण्याची वेळ आली आहे.
खामगाव शहर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. येथे शुध्द चांदीच्या खरेदीसाठी दुरूदूरून लोक येत असल्याने खामगावची ह्यरजत नगरीह्ण म्हणूनही ओळख आहे. कापसाची बाजारपेठ, धान्य बाजार यासाठीही खामगावचा नावलौकीक आहे. सद्यास्थितीत शहराचा विस्तार चांगलाच वाढला असून एक लाखाच्या जवळपास लोकसंख्या पोहचली आहे. घाटाखाली जिल्ह्याचे ठिकाण म्हणून खामगावकडे पाहीले जात असल्याने शहरात येणार्‍यांची गर्दी वाढतच आहे. शहरात दुरूदूरून लोक येत असल्याने त्यांच्या मनात शहराची १0-१२ वर्षापुर्वी तत्कालीन मुख्याधिकारी प्रकाश बोखड यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना नगर पालिकेने तयार केली. प्रायोजकांच्या माध्यमातून ह्यबांधा आणि जाहीरात कराह्ण असे या योजनेचे प्रारूप तयार करण्यात आले. त्यानंतर शहरातील महत्वाचे चौक सौंदर्यीकरणासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, ग्रुप वा वैयक्तिक जाहीरातीसाठी देण्यात आले. या योजनेला शहरातील अनेकांनी दायित्व स्विकारून चौकांचे सौंदर्यीकरणाची जबाबदारी घेतली.
या योजनेनुसार शहरातील बसस्टॅण्ड चौक, टिळक पुतळा, विकमसी चौक, टावर चौक, रायगड कॉलनी कॉर्नर, जलंब नाका, रेल्वे स्टेशन मार्ग योसाबत इतरही ठिकाणी मुख्य चौकात सौंदर्यीकरण करण्यात आले. काही दिवस हे चौक सुंदर व मनाला मनमोहक वाटत होते. बाहेरगावाहून येणार्‍या नागरीकांचे या सौंदर्यीकरणाकडे लक्ष वेधून जात होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी बोखड यांची बदली झाली आणि पुढील सर्व योजना बारगळली. या गोष्टीला १0 ते १२ वर्ष उलटून गेली. यादरम्यान नगर पालिकेचे वेळोवेळी सत्तांतर झाले. अधिकारी, पदाधिकारी बदलले मात्र या योजनेकडे कोणीच ढुंकुनही पाहले नाही. त्यामुळे सौंदर्यीकरण योजनेत लावलेल्या शिल्पांचे भग्न अवशेष तर कुठे गवत वाढल्याचे चौकाचौकात दिसत आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणार्‍या या योजनेला पुनरूज्जीवन मिळण्याची मागणी नागरीकामधून होत आहे.