शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे शेती मशागतीच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

ओमप्रकाश देवकर हिवरा आश्रम : गेल्या वर्षभरापासून अगोदरच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनता हैराण असताना आता पेट्रोल, डिझेल दरवाढीचा शेती ...

ओमप्रकाश देवकर

हिवरा आश्रम : गेल्या वर्षभरापासून अगोदरच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनता हैराण असताना आता पेट्रोल, डिझेल दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्‍यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

सध्या हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतात नांगरणी, वखरणी, पंजी, रोटाव्हेटर इत्यादी कामे करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी बळीराजाचे शेती मशागतीचे गणित चांगलेच महागले आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेती मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देतात. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे यावर्षी नांगरणी, वखरणी या शेती मशागतीच्या कामासाठी अधिक दर मोजावे लागत आहेत. पूर्वी शेतकरी शेती मशागतीची कामे पशुधनाच्या मदतीने करत होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती मशागतीचे कामे करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी नांगरणी, वखरणी, पेरणी इत्यादी कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्याला पसंती दर्शवितो. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसला तरी भाड्याच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची कामे केल्या जातात. मात्र काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्‍याचा फटका शेती क्षेत्राला बसला. इंधनाचे दर गगनाला भिडले. त्‍यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

त्‍यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत पडून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर परतीच्या पावसामुळेसुद्धा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित डबघाईला आले आहे.

शेती मशागतीच्या दरात वाढ

यापूर्वी नांगरणीसाठी एका तासासाठी ५०० रुपये लागत होते. त्यासाठी आता ७०० रुपये मोजावे लागतात. रोटाव्हेटरला यापूर्वी ८०० रुपये लागत होते. मात्र इंधन दरवाढीमुळे रोटाव्हेटरसाठी १००० रुपये मोजावे लागतात. तर पंजीसाठी मागील वर्षी ५०० रुपये लागत होते. त्यासाठी आता ७०० रुपये लागत आहेत.

प्रतिक्रिया

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे शेती मशागत, नांगरणी, वखरणी, पंजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र शेतमालाच्या भावात त्या प्रमाणात वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

-अरुण गुलाबराव देशमुख, प्रगतिशील शेतकरी, दुधा.