श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST2021-01-16T04:38:43+5:302021-01-16T04:38:43+5:30

१००८ महंत स्वामी अखंड चैतन्यपुरी महाराज व जिल्हा संघचालक शांतिलाल बोराळकर, जिल्हा संयोजक ॲड. गजानन ठाकरे यांच्या ...

Inauguration of Shriram Temple Fundraising Office | श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन

श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन

१००८ महंत स्वामी अखंड चैतन्यपुरी महाराज व जिल्हा संघचालक शांतिलाल बोराळकर, जिल्हा संयोजक ॲड. गजानन ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. याप्रसंगी सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्र, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांंचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक ॲड. गजानन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख १००८ महंत स्वामी अखंड चैतन्यपुरी महाराज यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या येथील भव्य मंदिर निर्माणकार्यात सर्व स्तरांतून संपूर्ण देशातून सर्व समाजातून निर्माण निधी संकलनासाठी आपन सर्वांनी वेळ व यथायोगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधीर मुळे यांनी केले, तर आभार अभियान तालुकाप्रमुख निलेश नाहटा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती मेहकरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Inauguration of Shriram Temple Fundraising Office