शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवठाणा परिसरात अवैध रेती उत्खनन

By admin | Updated: December 28, 2014 00:27 IST

शेतक-यांच्या तक्रारी : महसूल विभागाचे दुर्लक्ष.

दिवठाणा (बुलडाणा) : पैनगंगा नदी व परिसरातील नदी नाल्यामधून मोठय़ा प्रमाणावर अवैध रेतीचा उपसा सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.दिवठाणा शिवारामध्ये रामनदी व पैनगंगा नदी यांच्या संगम आहे. या परिसरामध्ये पैनगंगा नदी पात्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर रेती आहे. या परिसरामध्ये अवैध रेतीमाफीयाची मोठय़ा प्रमाणात रेती उपसण्याचे काम चालु असून महसुल विभाग जाणीव पुरक दुर्लक्ष करीत आहे. हजारो ब्रास रेतीची चोरुन उपसा सुरु असताना एकाही रेती वाहतुक करणार्‍या वाहणावर कार्यवाही आजपर्यंत करण्यात आली नाही. दिवठाणा परिसरामधून रेती उपसा होत असताना महसुल विभागाचे कर्मचारी नदी पात्राच्या हद्दीचा व गावहद्दीचा बागुलबुवा करुन कार्यवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. सवणा, दिवठाणा, उत्रादा, बेलदरी पेठ शिवारामधून खुले आम रेतींची वाहतुक व उपसा होत असताना चिखलीच्या महसुल विभाग बघ्याची भुमिका घेत आहे. अवैध रेती वाहतुक करणार्‍याकडून अनेक शेतकर्‍यांना धमक्या देण्याचा प्रकारही सुरु आहे. अवैध रेती वाहतुक करणार्‍या वाहनानी शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान सुध्दा करण्यात आले आहे. हजारो ब्रास रेतीची उचल होवून ही दंड मात्र एकाही वाहणावर करण्यात आला नाही. पैनगंगा नदीपात्रामध्ये मोठे मोठे खड्डे करण्यात आले आहेत. दरवर्षी मोठया प्रमाणात अवैध रेती उपसा झाल्यामुळे नदी पात्र अनेक ठिकाणी बदलेले आहे. काही ठिकाणी ७ ते ८ फुटापर्यंत नदी पात्र खोल करण्यात आले आहे. यामुळे नदी मात्र बदलण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. अवैध उपसा बंद न झाल्यास या परिसरातील शेतकरी महसुल विभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.