शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजा येथे अवैध दारू साठा जप्त

By admin | Updated: May 1, 2017 00:54 IST

देऊळगाव राजा- राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा पथकाने इंडिका कारमधून दारूच्या २४0 बाटल्यांसह पावणे दोन लाखाचा माल व राजकुमार मान्टे नामक कार चालकास अटक केली.

देऊळगाव राजा : देशी दारूची कारमधून वाहतूक करीत असताना मिळालेल्या माहितीवरून कारची तपासणी केली असता देशी दारूचे बॉक्स आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा येथील पथकाने एकाला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. सदर घटना रविवारी दुपारी घडली.देऊळगाव राजा ते चिखली रोडवर सिनगाव जहाँगीर फाट्यानजीक जिल्हा भरारी पथकाचे सुरेश चव्हाण दु.नि. सहकारी विशालसिंग पाटील, रामेश्वर सौभागे, अमोल अवचार, अमोल सुसरे, सोनाली उबरहंडे यांनी अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचला होता. वाहनांची तपासणी करत असताना टाटा कंपनीची इंडिका एम.एच.१४ ए.एन.४४९९ यामध्ये मागच्या सिटवर देशी दारूचे पाच बॉक्स २४० बाटल्या व आरोपी राजकुमार सुभाष मान्टे रा.देऊळगाव राजा याला कारसह पकडून त्याच्याकडून १ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप्त केला व आरोपीला न्यायालयात हजर केले, असा उल्लेख दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण यांनी वर्तमानपत्रांना प्रसिध्दीस दिलेल्या प्रेसनोटमध्ये केला आहे. प्रत्यक्षात जिल्हा भरारी पथकाने केलेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सदर घटनास्थळ हे रोडपासून काही मीटर अंतरावर असलेली गोशाळा आहे. देशी दारूच्या बॉक्सची संख्या खूप मोठी आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले पण पुढे काय झाले, याचा उल्लेखही प्रेसनोटमध्ये नाही. कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येऊन सायंकाळी पत्रकारांच्या दबावानंतर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बुलडाणा यांनी प्रेसनोट प्रसिद्धीसाठी काढली.