मानवी हक्क निसर्गदत्त - रोठे

By Admin | Updated: January 26, 2015 00:43 IST2015-01-26T00:43:48+5:302015-01-26T00:43:48+5:30

बुलडाणा येथे मानवी हक्क कार्यशाळा.

Human Rights Naturalized - Roshey | मानवी हक्क निसर्गदत्त - रोठे

मानवी हक्क निसर्गदत्त - रोठे

बुलडाणा : मानवी हक्क म्हणजे मानवाला प्राप्त झालेले अधिकार. शासनाकडून त्यांचे उल्लंघन होऊ शकत नाही व राष्ट्रीय कायद्याशिवाय ते उपभोगता येतात. ते निसर्गदत्त असून, व्यक्तीचे सर्वांगीण जीवन उंचावण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे सेंट थॉमस अँक्विनस हे जागतिक मानवी हक्कांचे जनक ठरले, असे मत आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले. स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण प्रकल्पांतर्गत मानवी हक्क कार्यशाळेचे आयोजन कां.ले. ताराबाई शिंदे सभागृहात गुरुवार, २२ जानेवारीला दुपारी २ ते ६ दरम्यान करण्यात आले होते. त्याला प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित अँड. रोठे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. रुक्मिणीताई इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या मानवी हक्क कार्यशाळेत संघटनेच्या इंदुताई लहाने, आशा सौभागे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यशाळेला सुरुवात आली. याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. संचालन स्वाती पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन नंदा खंडारे यांनी केले. कार्यक्रमासाठी शेख साहेब, दीपाली राऊत, अमोल अढाव यांच्यासह स्त्री मुक्ती संघटनेच्या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी परिङ्म्रम घेतले. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Human Rights Naturalized - Roshey