शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक मंदिरांचे होणार संवर्धन!

By admin | Updated: March 18, 2017 01:03 IST

लोणार विकास आराखड्यात समावेश; ९३ कोटी ४६ लाख रुपयांची होणार विकास कामे.

किशोर मापारी लोणार, दि. १७- लोणार विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून, या आराखड्यांतर्गत आता भग्नावस्थेत असलेल्या ऐतिहासिक व प्राचीन मंदिरांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. ह्यलोणार सरोवर संवर्धन आराखडा ठरतोय मृगजळह्ण या मथळ्याखाली ह्यलोकमतह्णने २२ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये येथील प्राचीन मंदिरांची होत असलेली दुरवस्था, वैज्ञानिक, नैसर्गिक व पुरातन वास्तू असलेला वारसा नष्ट होत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यांचे जतन करण्याची मागणी केली. लोणार सरोवर पर्यटन महोत्सव कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कृषिमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव व आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी लोकमत वृत्त मालिकेची दखल घेत येथील विकास कामासाठी आगामी होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मागणी करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते, तसेच लोणार विकास आराखड्यात प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचा मुद्दा जोडण्यात आला. १५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत लोणार पर्यटन विकास आराखडा ९३ कोटी ४६ लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू असून, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लोणार सरोवर परिसरातील दुर्मीळ व मौल्यवान असलेल्या वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, खडकाचे विनापरवानगी खोदकाम करून मानवी हस्तक्षेप वाढत चाललेला आहे.यामुळे लोणार सरोवराचा विकास तर दूरच; पण असलेला ठेवाही नष्ट होत चाललेला आहे. दिशाफलकाअभावी लोणारला येणार्‍या पर्यटकाची अनेकवेळा दिशाभूल झालेली असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कसेबसे येथे पोहोचल्यावर सरोवर पाहून थक्क झालेल्या पर्यटकांचा मात्र असुविधेमुळे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराबद्दल भ्रमनिरास होतो. कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधाही शहरात मिळत नसल्यामुळे देश व विदेशातील पर्यटक येथे न थांबता औरंगाबाद येथे जाणे पसंत करत असल्यामुळे लोणार सरोवर पर्यटन स्थळाची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून येत आहे.