शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टी दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाची टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

जिल्ह्यात हातभट्टी दारूचा सुळसुळा असल्याने तरुणांपासून वयोवृद्धापर्यंत व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ बेवारस गुन्हे ...

जिल्ह्यात हातभट्टी दारूचा सुळसुळा असल्याने तरुणांपासून वयोवृद्धापर्यंत व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ बेवारस गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईमध्ये ९७४ लिटर हातभट्टी दारू, १७ हजार ४२९ लिटर रसायन, ३०६.५९ लिटर देशी दारू व ६.८४ लिटर विदेशी दारू, तसेच २५ लिटर ताडी जप्त केली आहे. या मोहिमेमध्ये अवैध मद्य वाहतूक अथवा विक्री करणारे एकूण नऊ वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी ८ दुचाकी व १ तीनचाकी वाहन आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत ४ लाख ५१ रुपये आहे. तसेच वाहनाखेरीज इतर जप्त मुद्देमालाची किंमत ५ लाख ६१ हजार ३८० रुपये रुपये एवढी आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लाख १२ हजार ३८० रुपये इतकी आहे.

यांच्यावर करण्यात आल्या कारवाया

मोहिमे दरम्यान ८ सप्टेंबरला बिबी मेहकरचे दुय्यम निरीक्षक एस. डी. चव्हाण यांनी एक वारस गुन्हा नोंदवून ४७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ४५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी आहे. तसेच ११ सप्टेंबरला मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारात दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी एक वारस गुन्हा नोंदवून ३७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३६ हजार रुपये किमतीच्या दुचाकीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पिंपळगाव काळे शिवारात एक वारस गुन्हा नोंदवीत ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ६५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी आहे. तसेच गव्हाण फाटा येथे एक वारस गुन्हा नोंदविला आहे. या ठिकाणी ७१ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमालामध्ये ६० हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त केली आहे. मलकापूर तालुक्यातील हरसोडा जुने येथे एक वारस गुन्हा नोंदवित ७० हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी आहे.

ही टीम करीत आहे कारवाई

जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये नागपूरचे विभागीय उपआयुक्त मो. सु. वर्धे, अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जी. आर. गावंडे, दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, आर. के. फुसे, अमित अडळकर, रविराज सोनुने, एस. डी. चव्हाण, आर. आर. उरकुडे, वा. रा. बरडे, पी. व्ही. मुंगडे व सर्व जवान, जवान नि वाहनचालक ही टीम सध्या जिल्हाभरात हातभट्टी दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे.