मुख्याध्यापकास मारहाण

By Admin | Updated: September 4, 2015 23:53 IST2015-09-04T23:53:48+5:302015-09-04T23:53:48+5:30

जळगाव जामोद येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्यावर गुन्हा दाखल.

Headmaster beaten up | मुख्याध्यापकास मारहाण

मुख्याध्यापकास मारहाण

जळगाव जामोद (जि. बुलडाणा ) : तालुक्यातील गाडेगाव बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नामदेव फकीरा पवार वय ५४ यांना शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय रामचंद्र महाले रा.गाडेगाव यांनी दारु पिऊन मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व जिवे मारण्याची धमकी देवून अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी शिक्षकदिनाच्या आदल्या दिवशी गाडेगाव येथे घडली. याबाबत मुख्याध्यापक पवार यांनी जळगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, संजय महाले हा समिती सदस्य ४ सप्टेंबर रोजी दुपारी शाळेत दारु पिवून आला व मला वर्ग तपासायचे म्हणत सर्व वर्गांमध्ये फिरला. मुख्याध्यापक गेले असता त्यांना लोटपाट करुन शिवीगाळ केली व तोंडावर चापट मारली. मुख्याध्यापकाच्या मोटारसायकलची चाबी काढून रिपोर्ट दिल्यास जिवंत मारुन टाकीन आणि पुन्हा शाळेत आल्यास खुपसून टाकण्याची धमकी दिली. यावेळी शाळेत इतर शिक्षक हजर होते. तक्रारीवरुन जळगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, २९४, १८६, ३२३ आणि ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे हे करीत आहेत. सदर घटनेनंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी हरिभाऊ पांडे, विजय म्हसाळ, नामदेव बगाडे, प्रभाकर भाकरे, राजेश भिवटे तथा सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांनी ठाणेदार पाटकर यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली.

Web Title: Headmaster beaten up