भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल

By अनिल गवई | Updated: August 23, 2024 17:11 IST2024-08-23T17:11:40+5:302024-08-23T17:11:58+5:30

याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे.

He grabbed the dog's legs and swung them round and round and kild A case has been registered against unknown people in Khamgaon | भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल

भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल

खामगाव: अंगावर भुंकतो म्हणून एका कुत्र्याला दोघांनी गोलगोल फिरवून खाली आपटले. यात कुत्र्याचा मृत्यू झाला. ही घटना स्थानिक भुसावल चौकात गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, शहरातील भुसावल चौकात एका एक वर्ष वयाचा कुत्रा अंगावर भुंकतो म्हणून दोघांनी मोटारसायकल थांबविली. कुत्र्याचे मागील दोन पाय पकडून गोलगोल फिरविले. त्यानंतर कुत्र्याला खाली रस्त्यावर आपलटले. त्यामुळे कुत्र्यांचा मृत्यू झाला. मृत कुत्र्याला दोघांनी उचलून बारादरी परिसरात फेकून दिले. अशी तक्रार दाळफैलातील सिध्देश अनिल निंबोळकर(२४) यांनी शहर पोलीसांत दिली. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी दोन अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२५, २७०, (५) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास  सफौ मोहन करुटले करीत आहेत.
 

Web Title: He grabbed the dog's legs and swung them round and round and kild A case has been registered against unknown people in Khamgaon