शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 3:33 PM

कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यासह राज्यभरात अतिवृष्टीमुळे सर्वच खरीप पिके शेतकºयाच्या हातून गेली आहेत. थोड्याफार प्रमाणात हाती आलेल्या उत्पादनाचीदेखील प्रतवारी घसरल्याने शेतमाल अत्यल्प भावात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. आता सोयाबीन व कपाशीमध्ये आंतरपिक म्हणून घेण्यात आलेल्या तूर पिकावर शेतकºयांची मदार होती. या पिकाच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक हातभार लागेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यासह पश्चिम वºहाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. जोमात असलेल्या तूर पिकाला या वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. सध्या तुरीवर कोवळ्या शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहेत. आधीच आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना तूर पिकाची निगा राखण्यासाठी खर्च वाढल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शेतकºयांची या संकटातून सुटका करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. कमीत कमी खर्चामध्ये रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरणाºया औषधांची फवारणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.बुलडाणा, वाशिममध्ये सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रबुलडाणा जिल्ह्यात तूर पिकाचे सरासरी क्षेत्र ६५ हजार ५३ तर वाशिममध्ये ५२ हजार ८२ हेक्टर आहे. या दोन्ही ठिकाणी सरसरीपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाली आहे. बुलडाणा ७६ हजार ५०७ तर वाशिम जिल्ह्यात ६१ हजार ९७१ हेक्टरवर प्रत्यक्षात लागवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातही तूर पिकाचे क्षेत्र समाधारकारक आहे. सरासरी ५८ हजार ६६२ असून प्रत्यक्ष लागवड क्षेत्र ५५ हजार ४९५ एवढे आहे. यावरून पश्चिम वºहाडातील तिनही जिल्ह्यात तूर पिकाची विक्रमी लागवड झाली आहे. जमिनीमध्ये ओलही भरपूर असल्याने ही परिस्थिती या पिकासाठी पोषक आहे. सध्या पडलेल्या रोगांपासून या पिकाची सुटका केल्यास शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी