शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी बँकेत हेलपाटे

By admin | Updated: June 28, 2015 23:17 IST

मेहकर तालुक्यातील प्रकार; अनेक शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत.

मेहकर (जि. बुलडाणा) : स्थानिक सेंट्रल बँकेमध्ये गेल्या एक महिन्यापासून शेतकरी पीककर्जासाठी चकरा घालत आहेत; मात्र सेंट्रल बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. गत एक महिन्यापासून १४ गावांतील शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये चकरा घालत आहेत; मात्र बँक व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. व्यवस्थापक हे शेतकर्‍यांना व्यवस्थित वागणूक देत नसल्यामुळे शेतकर्‍यांची बाजू मांडण्यासाठी कैलास राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर व शेतकरी विनोद फलके हे व्यवस्थापकाकडे गेले असता, व्यवस्थापकाने त्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता लोटपाट करून बँकेच्या बाहेर काढल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिली आहे. यावेळी मेहकरचे ठाणेदार राठोड हे बँकेमध्ये आले होते. त्यांनीही शेतकर्‍यांची बाजू ऐकून घेतली नसल्याची तक्रार आहे. बँक व्यवस्थापकावर तात्काळ कारवाई न केल्यास ६ जुलै रोजी आत्मदहन करू, असा इशारा कैलास राऊत, राजेश मगर, विनोद फलके यांनी २५ जून रोजी मेहकर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.